23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरजमिनीसाठी माजी सैनिकाचे उपोषण

जमिनीसाठी माजी सैनिकाचे उपोषण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : माझ्या दारूच्या व्यसनामुळे बेकायदा कब्जा केलेली १० एकर जमीन परत मिळावी या मागणीसाठी मार्डी येथील माजी सैनिक मनोहर माशाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांना शासनाने १० एकर जमीन मिळाली आहे. वहिवाटत असलेली ५ एकर जमीन त्यांनी व्यसनातून गावातील राजू दत्तू यादव, सुखदेव दत्तू यादव व दादाराव दत्तू यादव यांना रजिस्टर नोंदणी करून दिली होती. ही जमीन यादव यांनी बळकावली असून मला परत जमीन मिळावी अशी माशाळकर यांची मागणी आहे. माशाळकर यांनी निवेदनात बेकायदेशीर साठेखत रद्द झाल्याचे म्हटले आहे.

याबाबत सोलापूर तालुका पोलीस तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून हा सर्व प्रकार सांगितला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. साठेखत केलेली पाच एकर व इतर पाच एकर जमीन तेच वहिवाटत असल्याने माझ्या कुटुंबावर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

एका न्यायालयाने माशाळकर यांच्या बाजुने निर्णय दिला आहे मात्र दुसऱ्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यादव हे न्यायालयाने स्थगिती दिल्याने तुम्ही जमीन द्या म्हटले तर, कोर्टाचा अवमान केला म्हणून दाद मागेन असे सांगतात. कागदपत्र पाहिली असता न्यायालयीन बाबीत आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही. ही सर्व कागदपत्र व माहिती तहसीलदार जयवंत पाटील यांना दिली असल्याचे मंडल अधिकारी अविनाश गायकवाड यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या