34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeसोलापूरसर्पदंश झालेल्या कर्मचाऱ्याचा मुख्याधिकाऱ्यांनी उचलला खर्च; दैनिक एकमतच्या बातमीचा दणका

सर्पदंश झालेल्या कर्मचाऱ्याचा मुख्याधिकाऱ्यांनी उचलला खर्च; दैनिक एकमतच्या बातमीचा दणका

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : महिन्याभरात सर्पदंश होण्याची दुसरी घटना घडल्यामुळे बार्शीच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दैनिक एकमतच्या बातमीची आणि वार्ताहर यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन स्वतःच्या पगारातून खर्च उचलला आहे. यावेळी दैनिक एकमतशी बोलताना मुख्याधिकारी यांच्या प्रतिनिधीने मुख्याधिकारी दगडे-पाटील यांनी बार्शी नगरपालिका हा माझा परिवार असून तिथे काम करणारा प्रत्येक कर्मचारी हा माझा कौटुंबिक सदस्य आहे, याच भावनेतून अभयराज उर्फ विकी ओहोळ या कर्मचाऱ्याचा हॉस्पिटलचा खर्च उचलला असल्याचे सांगितले.

अशोक अलाट या कर्मचाऱ्याचा महिन्यापूर्वीच सर्पदंश होऊन मृत्यु पावला होता.त्यामुळे एक घटना ताजी असताना दुसरी घटना घडल्यामुळे बार्शी नगरपालिकेच्या येत्या महिन्याभरातल्या सर्वसाधारण सभेत सफाई कामगारांचे विमा, कॅशलेस हे महत्वाचे विषय मांडणार असून कामगारांसाठी आणखी चांगल्या योजना राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.तसेच मुख्याधिकारी यांनी कामगारांना गमबूट,हातमोजे,मास्क, सॅनिटायझर असे साहित्य दिले असून कामगारांनी काम करत असताना त्यांचा वापर करावा.तसेच मी कायम माझ्या सफाई कामगारांच्या पाठीमागे आहे.त्यांनी कोरोना काळात केलेले आणि करत असलेले काम कोणीही विसरणार नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.मुख्याधिकारी यांनी केलेल्या कामाचे यावेळी सर्व स्थरातून कौतुकही करण्यात आले.

डबघाईला आलेल्या पथविक्रेत्यांच्या मदतीला सरसावली सांगोला नगरपालिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या