29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeसोलापूरदुचाकी कंटेनरला धडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

दुचाकी कंटेनरला धडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सांगोला : सांगोला मार्केट यार्डात डाळिंब विक्री करून दुचाकीवरून परत गावाकडे जाताना समोरून येणाऱ्या फिर्याद दिली आहे. वाहनाच्या उजेडात रस्त्याच्या साइड पट्टीवर थांबलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने दुचाकीने पाठीमागून कंटेनरला धडक दिली. यामध्ये डोक्यात व मानस गंभीर मार लागल्याने वृद्ध शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.वकील उस्मान मुजावर (वय ६०, रा. मांजरी, ता. सांगोला) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

हा अपघात शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवर घडला. याबाबत दिलखुश उस्मान मुजावर यांनी परप्रांतीय चालकाविरुद्ध पाठीमागून जोराची धडक बसल्याने हाअपघात झाला. अपघातात वकील मुजावर रोडवर खाली पडल्याने डोकीस, मानेस गंभीर मार लागल्याने जागीच बेशुद्ध अवस्थेत पडले.

मांजरी येथील वृध्द शेतकरी वकील उस्मान मुजावर हे ३० सप्टेंबर रोजी सांगोल्यातील बाजार समितीत डाळिंबाची विक्री करून रात्री ९ च्या सुमारास एमएच ४५ / एएम ५६४७ या दुचाकीवरून परत मांजरीला जात होते. त्यांची दुचाकी पंढरपूर रोडवरील नरोटे वस्ती येथे आली असता पंढरपूरकडून येणाऱ्या वाहनाच्या उजेडात रस्त्याच्या साइड पट्टीवर थांबलेला एमएच ४५ / एच १४८१ हा कंटेनर दिसला नाही.

त्यामुळे अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारांकरता रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारांपूर्वी मृत्य झाला. पोलिसांनी वकील मुजाव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक विजय प्रकाश मन्साराम मिश्रा (रा. गौरा, ता. चुनार, जि मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्ह दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या