25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरउसाला पाणी देत असताना विजेच्या तीव्र धक्क्यामुळे शेतमजुराचा मृत्यू

उसाला पाणी देत असताना विजेच्या तीव्र धक्क्यामुळे शेतमजुराचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

माढा : उसाला पाणी देत असताना धनाजी नागनाथ देवकर (वय ५०, रा. माढा) हा शेतमजूर विजेच्या धक्क्याने मरण पावला. रविवार, १० जुलै रोजी घडलेल्या या घटनेने माढ्यात हळहळ व्यक्त झाली.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार धनाजी यांनी माढ्यातच शारदाबाई शहाणे यांची शेती बटाईने केली होती. ते रविवारी सकाळी उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. मोटर चालू करताना विजेचा धक्का बसला. त्यांना उपचारास दाखल केले असता तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शेताजवळील शेतकरी सुनील शहाणे हे दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान मोटार चालू करायला गेले असता धनाजी हे त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी धनाजी यांचे चुलत भाऊ अजय देवकर यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. दरम्यान धनाजी यांचा मुलगा महेश आणि भाऊ अजय देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्यांच्या शरीराचे निरीक्षण केले असता करंगळीला भाजल्यासारखी दिसून आली.

त्यांनी तत्काळ विद्युत मोटारच्या पेटीमधील फ्यूज काढून उपचारासाठी माढ्यातील रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अजय देवकर यांनी माढा पोलिसात खबर दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या