36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसोलापूरनैसर्गिक संकटामुळे शेतकरी व सामान्य नागरिक आर्थिक संकटात; आर्थिक मदत करण्याची मागणी

नैसर्गिक संकटामुळे शेतकरी व सामान्य नागरिक आर्थिक संकटात; आर्थिक मदत करण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर (अपराजित सर्वगोड ) : राज्यासह उजनी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात महापूर आला होता. यामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. चौथ्या दिवशी पुराचे पाणी ओसरू लागल्याने नदीकाठच्या अनेक गावातील घरांची पडझड झाली असून शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे.

उजनी धरण क्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी पंढरीत वेगाने दाखल झाले होते. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. शहरासह ग्रामीण भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील ९५ गावे बाधित झाली होती. यामुळे सोळा हजाराहून अधिक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. साडेतीन हजाराहून अधिक कुटुंबाच्या घरात पाणी शिरले होते.

यामुळे ग्रामीण भागातील नदीकाठच्या गावांमधील शेतीचे तसेच शहरातील छोटे-मोठे व्यवसायिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. पंढरपुरात भरणाऱ्या चार यात्रांवर येथील नागरिकांचे आर्थिक व्यवहार अवलंबून असतात मात्र देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गेली आठ महिन्यापासून विठ्ठल मंदिर बंद असल्याने चैत्र कार्तिकी आषाढी यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. ह्यामुळे पंढरपुरातील होणारी आर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प झाल्याने येथील नागरिक आर्थिक अडचणीत सापडला असताना अतिवृष्टीमुळे चंद्रभागेला आलेल्या पुराने अनेक छोटे-मोठे व्यवसायिक अधिक अडचणीत सापडला आहे. याकडे गांभीर्याने विचार करून येथील पूर बाधित नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टेंभुर्णी येथील नुकसानग्रस्त कुटूंबाची खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या