37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसोलापूरगोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा घेतला वसा

गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा घेतला वसा

एकमत ऑनलाईन

अनघा राघवेंद्र जहागिरदार यांचे बी.ए.बी.एड. पर्यंत शिक्षण झाले असून जुळे सोलापुरातील कमला नेहरू मराठी प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. गरीब घरातल्या मुलांसाठी पहिली ते सातवीपर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण देणारे ही शाळा असून गेली ११ वर्षे मुलांना मोफत सहल शाळेतर्फे घडविली जाते. अनघा यांचे सास-यांनी १९९१ साली श्री राघवेंद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कमला नेहरू प्राथमिक शाळेची स्थापना केली.

पती राघवेंद्र जहागिरदार यांनीही शाळेच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पती व सास-यांच्या मार्गदर्शनाने अनघा यांनी शाळेची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत ती त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यांचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत हे असून सर फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हा महिला समन्वयक म्हणून त्या २०१८ पासून जबाबदारी पार पाडत आहेत.

या बरोबरच महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मुलन आदी सामाजिक क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. संघर्ष करण्याची जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर १२ वर्षे शिक्षण क्षेत्रातील यशस्वी प्रवास करता आल्याचे अनघा जहागिरदार यांनी सांगितले. पती व सास-यांच्या निधनानंतर त्यांनी शाळा व संसाराची जबाबदारी यशस्वीपणे पेलली.

अनघा राघवेंद्र जहागिरदार
(मुख्याध्यापिका)

ऑनलाईन वस्तू विक्री व्यवसायातून मिळवली ओळख – किर्ती धनेश देशपांडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या