27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसोलापूरबंदुकीचा धाक, पाईपने मारून हॉटेल व्यावसायिकाचे अडीच लाख लंपास

बंदुकीचा धाक, पाईपने मारून हॉटेल व्यावसायिकाचे अडीच लाख लंपास

एकमत ऑनलाईन

मोहोळ : स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून आलेल्या चार अज्ञातांनी हॉटेल व्यावसायिकाची चारचाकी गाडी रस्त्यात अडवून त्याला बंदुकीचा धाक दाखवून तसेच लोखंडी पाईपने मारहाण करुन त्याचे अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील विश्रामगृहासमोर ३१ मेच्या पहाटे घडली. सुरेश उर्फ प्रकाश गुंड (रा. खंडाळी, ता . मोहोळ) असे लूटमार झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळीयेथील सुरेश उर्फ बबलु प्रकाश गुंड हे हॉटेल चालवतात. ३० मे रोजी ते मित्र चित्तारा उर्फ लाला बाळू मुळे याच्यासह अशोक लेलँड बडा दोस्त ( एमएच ४५ एई ५३४८) या वाहनातून निखिल मार्केटिंग, पुणे यांच्याकडे नाना निवृत्ती चव्हाण यांचे किराणा मालाचे पैसे आणण्यासाठी गेले होते. रात्री पावणे अकरा वाजता हे दोघे पैसे घेऊन पुण्याहून निघाले. मध्यरात्री अडीच वाजता गुंड मोडनिंब येथे मुळे सोडून खंडाळीकडे निघाले.

पहाटे तीन वाजता त्यांचे वाहन शेटफळ येथील विश्रामगृहासमोर आले असता, पाठीमागून आलेली पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ व ग्रे रंगाची स्विफ्ट कार त्यांच्या अशोक लेलँड बडा दोस्त समोर येऊन उभी राहिली.

त्या दोन्ही गाड्यांतून लाल शर्ट व निळी जिन्स, निळा पूर्ण बाह्यांचा ट्रॅक सुट, काळी पॅन्ट इ शर्ट आणि टीशर्ट व जिन्स घातलेले चार अज्ञात लोक खाली उतरले. त्यातील एकाने सुरेश गुंड यांच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकून मारली. एकाने त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरवून त्यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यावेळी लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने गुंड यांच्या डोक्याला बंदूक लाऊन धाक दाखवत आवाज करू नकोस, नाहीतर गोळ््या घालीन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी गुंड यांच्या गाडीत पांढ-या पिशवीत ठेवलेले अडीच लाख रुपये काढून घेतले व गुंड यांची गाडी लॉक करून चावी घेऊन पसार झाले.

सर्व लुटारूंच्या पायात बुट व तोंडावर मास्क होते. त्यांच्या दोन्ही गाड्यांवर नंबर प्लेट नव्हती, असे सुरेश गुंड यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चार अज्ञात लुटारूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मोहोळचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या