अक्कलकोट ::सलगर येथे कारहुणवी सणात लावलेल्या डॉल्बीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांतील ११ जणांविरुद्ध उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटातील सहाजणांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली
या प्रकरणी पहिल्या गटातील रविराज शटगार यांनी फिर्याद दिली आहे. १६ जून रोजी रविराज शटगार हे स्वतः किराणा दुकानातून साहित्य आणण्यासाठी गेले होते.
यावेळी आरोपी एजाज बिराजदार, बिराजदार यांनीही फिर्याद दिली आहे. सद्दाम बिराजदार, नजीर बिराजदार, ईजमान बिराजदार, शुकुर बिराजदार यांनी संगनमत करून किराणा साहित्य देत नाही म्हणून वादविवाद केला . शटगार यांना मारहाण होत असताना सोडवायला आलेले शंकर पाटील, रत्नाकर पाटील, यांनाही मारहाण करण्यात आली. मारहाणीत दोघेही जखमी झाले.याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भावीकट्टी करत आहेत.
दुसर्या गटातील इक्बाल हसन बीराजदार यांनीही फिर्याद दीली आहे.१५जून कारहुणवी सणाच्या दीवशी डॉल्बी लावण्यावरून वाद झाला होता.याचा राग मनात धरून १६जून रोजी दुपारी२.३॰ वाजता आरोपी शंकर पाटील,गजानन बीराजदार,महांतेश शटगार,रत्नाकर पाटील,इरप्पा निंगदाळे यांच्यासह ८ते १० साथीदारांनी काठी अन लाकडाने मारहाण करून दुकानाची तोडफोड केली. तसेच ७० हजार रुपये घेऊन गेले.अशी फिर्याद दीली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी हे करीत आहेत.
पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा आरोपींना अटक केली असून त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायदंडाधिकारी बाळासाहेब गायकवाड यांनी तीन दिवसांची पोलीस
कोठडी सुनावली.