23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरमुलीला पळवून नेल्याच्या वादातून हाणामारी, नऊ जणांवर गुन्हा

मुलीला पळवून नेल्याच्या वादातून हाणामारी, नऊ जणांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सोलापूर: मुलीला पळवून नेल्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये सदर बाजार पोलीस स्टेशनसमोर तुफान हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले असून, या प्रकरणी पोलीस शिपाई नितेश काळे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुलीला पळवून नेल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबांमध्ये गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्यासमोरच मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले.

दोन्ही गटांच्या सदस्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात दोघे जखमी झाले या प्रकरणी सूर्यकांत नागेश होसमनी (वय २९), चंद्रकांत नागेश होसमनी ( वय ३२), उलगप्पा साखरे (वय ४०), बसवराज होसमनी, रवी सिद्राम पापस (वय २९), निखिल मिलिंद माने (वय २२), मिलिंद पांडुरंग माने, बालाजी सुनील माने, शकुंतला मिलिंद माने (वय ४१, सर्व रा. सोलापूर) या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या