22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसोलापूरसुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून तडवळच्या पेट्रोल पंपावर गोळीबार

सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून तडवळच्या पेट्रोल पंपावर गोळीबार

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट : तडवळ (ता. अक्कलकोट) येथील मल्लिकार्जुन पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर सुट्टे पैशाच्या कारणावरून झालेल्या वादविवादात बुलेटवर आलेल्या व्यक्तीने हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तडवळ येथे तडवळ ते सोलापूर रस्त्यावर अण्णाराव याबाजी यांचे पेट्रोल पंप मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या पंपावर दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रमुख आरोपी चिदानंद राजशेखर बिराजदार (रा. कोर्सेगाव, ता. अक्कलकोट) हा बुलेटला पेट्रोल भरण्यासाठी आला होता. पेट्रोल भरल्यानंतर सुट्टे पैशाच्या कारणावरून पंप कर्मचाऱ्यांबरोबर वादविवाद केला.

तेव्हा गावाकडील कोर्सेगावहून काही लोकांना बोलावून घेतले. तोपर्यंत तडवळमधूनही बघ्याची गर्दी झाली होती. दरम्यान, दोन्ही गटात झालेल्या झटापटीत पंपावरील एका १६ वर्षीय मुलाला मारहाण झाल्याने तो जखमी झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक काकडे, फौजदार प्रवीण लोकरे, हवालदार संजय पांढरे, कॉ. डांबरे, जगदीश राठोड .यांनी सदर घटना घडल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पाचशे रुपयाची खराब नोट देऊन सुट्टे पैसे मागण्यावरून ही घटना घडल्याचे राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या पोलीस नियंत्रण कक्षातून मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना संदेश आला. कलकर्जाळ येथील एकाने गोळीबार केला असून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून तो पसार झाला आहे. कर्नाटकच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. इतकाच निरोप धडकला, त्याच क्षणी बाहेर पडून मांजरे यांनी आरोपीचा पाठलाग केला. अवघ्या ४७ मिनिटात गोळीबार केलेला आरोपी जेरबंद करण्यात मंद्रूप पोलिसांना यश आले. खासगी वाहनचालक इम्तियाज मुल्ला यांचे सहकार्य लाभले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या