Saturday, September 23, 2023

अक्कलकोटमध्ये पहिला बळी

प्रतिनिधी/सोलापूर
अक्कलकोट तालुक्यातील कोरोनाबाधिताचा पहिला बळी ठरला आहे. शनिवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार शहर-जिल्ह्यात ५६५ कोरोनाबाधित तर २८४ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तर यापैकी आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

आज सकाळी ८ च्या सुमारास १३५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यातील १०३ निगेटिव्ह तर ३२ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात २१ पुरूष आणि ११ महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत एकूण ५३२९ अहवाल प्राप्त झाले असून यातील ४७८१ निगेटिव्ह तर ५४८ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आज एकही मृत नाही. कालपर्यंत मृतांची संख्या ४० इतक आहे. आत्तापर्यंत २२४ रूग्ण बरे झाले आहेत. तर २८४ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

सोलापूर शेजारी असलेल्या अक्कलकोट शहरातही आज कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्कलकोट शहरातील मधला मारुती परिसरातील ४६ वर्षीय व्यापा-याचा मृत्यू झाल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

Read More  भोकर येथे जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद

निमोनियाचा त्रास होत असल्याने हे व्यापारी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथील डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा त्यांना सल्ला दिला. पुढील उपचारासाठी त्यांना सोलापुरात पाठविण्यात आले. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्या व्यापा-याचा २१ मे रोजी मृत्यू झाला आहे. त्यांना गेल्या वर्षी देखील निमोनिया झाल्याचे समजते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहितीही प्रांंताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

अक्कलकोटमधील या व्यापा-याचे फरशी व्यवसायानिमित्त मैंदर्गी येथेही येणे-जाणे असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मयत व्यापारी ज्या परिसरात राहत होते तो परिसर, ते व्यापारी ज्या भागात जात होते तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या