सोलापूर : भीमा तेलगाव ते मंद्रूपला जात असताना पिकअप उलटल्याने पिकअपमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. यात धुंडप्पा शिवराम पुजारी ( वय ७०), बिरप्पा शिवराम पुजारी ( वय ४०), गुणाबाई सायब्बा कांबळे (वय ६०, रा. भंडारकवठे, दक्षिण सोलापूर),
श्यामराव जगन्नाथ (वय ७०), रामप्प मुत्यप्पा पुजारी (वय ५०, रा. भीम तेलगाव, दक्षिण सोलापूर) असे जखम झालेल्या पाच जणांची आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.