29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसोलापूरमाढा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतक-यांना ४ कोटी ५३ लाख कर्ज माफी मिळणार

माढा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतक-यांना ४ कोटी ५३ लाख कर्ज माफी मिळणार

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे भिमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी पुरग्रस्त शेतक-यांसाठी राज्यसरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या ६६६ शेतक-यांची एकुण ४ कोटी ५३ लाख कर्ज माफीची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहीती माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

मागील वर्षी माहे जुलै व ऑगस्ट मध्ये सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती. या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे माढा मतदारसंघातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ४३ गांवांना या पुराचा फटका बसून शेतक-यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी आ. बबनराव शिंदे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत मदत देण्याची मागणी शासनाकडे केली होती. बाधित शेतक-यांना आघाडी सरकारने संबंधित पुरग्रस्त शेतक-यांना कर्ज माफी देण्यासाठी योजना जाहीर केलेली होती.

गतवर्षीच्या महापुरात नुकसान झालेल्या पुरग्रस्त शेतक-यांच्या कर्जमाफीची रक्कम शासनाकडून प्राप्त झालेली आहे येत्या चार दिवसांत प्रत्यक्ष शेतक-यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. यामध्ये माढा तालुक्यातील १२ गावातील १८२ पुरग्रस्त शेतक-यांना रू.१ कोटी१६ लाख २० हजार ४३ इतक्या कर्ज माफीचा लाभ मिळालेला असून रक्कम शेतक-यांची खाती असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीय बँक, व्यापारी बँक यामध्ये खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे त्यामध्ये बेंबळे, मिटकलवाडी, रूई, आलेगांव(बु), रांझणी, वडोली, चांदज, आलेगाव(खु), टाकळी(टे), माळेगांव, शेवरे, गारअकोले तसेच पंढरपूर तालुकयातील २२ गावातील ३०६ पुरग्रस्त शेतक-यांना रू.२ कोटी १६ लाख २४ हजार ७१४ इतकी कर्ज माफी मिळालेली असून त्यामध्ये अजनसोंड, देगांव, शेगांवदुमाला, सुस्ते, सांगवी, खेडभोसे, भोसे(तरटगांव), पेहे, उंबरे(पागे), करोळे, कान्हापूरी, पिराची कुरोली, वाडीकुरोली,चिंचोली(भो), गुरसाळे, भटुबंरे, बादलकोट, ईश्वरवठार , व्होळे, नांदोरे, देवडे, पट.कुरोली , व माळशिरस तालुकयातील ९ गावातील १७८ पुरग्रस्त शेतक-यांना रू. १ कोटी २० लाख ७९ हजार इतकी कर्ज माफी मिळालेली असून त्यामध्ये लवंग, वाघोली, मिरे, नेवरे, उंबरे(वे), महाळूंग, जांभूड, वाफेगांव, खलवें या गावांतील पुरग्रस्त शेतक-यांची कर्ज माफी होणार आहे.

संबंधित पुरग्रस्त शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा याबाबत मी फेब्रुवारी, २०२० मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सुचना उपस्थित करून मदत देण्याची मागणी शासनाकडे केलेली होती. त्यानुसार अतिवृष्टीने बाधीत शेतक-यांनाही कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी शासनाकडून निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले होते. शासनाकडून दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाल्यामुळे माढा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी १५ कोटी रूपयांची कर्जमाफी शेतक-यांना मिळणार आहे.
आ. बबनदादा शिंदे

क्रीडापटूंचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या