17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeसोलापूरमोहोळ तालुक्यातील २० गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

मोहोळ तालुक्यातील २० गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

एकमत ऑनलाईन

मोहोळ : शेतक-यांची काढणीला आलेले उडीद,मटकी, मूग,मक्का पिके तशीच्यातशी शेतामध्ये पडून होती परतीच्या पावसाने मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने घातलेल्या थैम नामुळे नदीकाठच्या वीस गावांमध्ये पाण्याने वेढा दिला असून गुरुवारी सकाळपासून महसूल , पोलिस प्रशासनासह रेस्क्यू ऑपरेशन च्या माध्यम मधून सुमारे ८० लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम चालू असून या पावसामुळे तालुक्यातील नदीकाठच्या शेकडो एकर जमिनी वाहून गेल्या असून अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील दोन दिवसापासून तालुक्यामध्ये पडलेल्या जोरदार परतीच्या पावसाने सीना व भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीकाठच्या पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटला आहे . घाटणे , मलिकपेठ , खरकटणे , वाळुज , देगाव , नरखेड , कोळेगाव , आष्टे , रामंिहगणी , अर्जुनसोंड , पांडवाची पोफळी , साबळेवाडी , लांबोटी , शिंगोली ,तरटगाव आधी सीना कडेच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने हजारो एकर शेती पाण्यात उभी असून अनेक पिके वाहून गेली आहेत तर घरे आणि जनावरे वाहून गेले आहेत.

सीना नदीच्या कार्यक्षेत्रामध्ये ना भूतो ना भविष्येतो असा भरपूर पाऊस झाल्याने आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा पूर आल्यामुळे व शिरापूर नजीक भोगावती आणि नागझरी नदीचे पाणी सिनेलाच मिळत असल्यामुळे अचानक रात्रीच्या एक ते दोन दरम्यान पाणी पातळी वाढत नदीकाठच्या वस्त्यांना पाण्याने वेढा दिल्यामुळे अनेक नागरिकांना बाहेर पडता आले नाही . त्यामुळे नदीकाठच्या वस्त्या वरती बांधून ठेवलेली जनावरे या पुरामुळे पाण्यात वाहून गेल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान मलिकपेठ बंधायावर पाणी आल्याने मोहोळ वैराग रस्ता बंद झाला असून बेगमपूर भीमा नदीच्या पुलावर पाणी आल्याने मोहोळ मंगळवेढा रस्ता तर तिहे येथील पुलावर पाणी आल्याने कुरुल कामती सोलापूर रस्ता बंद झाला आहे . यामध्ये एन डी आर एफ चे जवान सर्व नागरिकांना पाण्याच्या बाहेर सुखरूप काढत आहेत.

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे आदमापूर येथील बाळुमामा देवस्थान ची मेंढरे आलेली आहेत मात्र सतत पडणा-या पावसामुळे त्यांना कोणताही निवारा उपलव्य होत नव्हता.दरम्यान माजी आमदार राजन पाटील यांनी या मेंढ्यांसाठी लोकनेते साखर कारखान्यातील साखर गोडाऊन चा निवारा देऊन या मेंढरांची सोय केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . मोहोळ तालुक्यातील प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन राबवित घाटणे येथील २२, मलिकपेठ येथील १५, कोळेगाव येथील १०, पोफळी येथील ४, अर्जुनसोंड येथील २३, साबळेवाडी येथील ५ असे ८० नागरिकांना बाहेर काढण्यात एन डी आर एफच्या जवानाना यश आले आहे.

भाजपा कार्यकर्त्याकडून पोलिसांसमोरच एकाची हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या