20.8 C
Latur
Friday, January 22, 2021
Home सोलापूर ऊसदरासाठी जनहितच्या कार्यकर्त्यांनी युटोपियनच्या गव्हाणीमध्ये टाकल्या उडया

ऊसदरासाठी जनहितच्या कार्यकर्त्यांनी युटोपियनच्या गव्हाणीमध्ये टाकल्या उडया

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : एफआरपीसह ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी सोमवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास कचरेवाडी येथील युटोपियन शुगरच्या गव्हाणीत उड्या टाकल्या. त्यामुळे ऊस गाळप थांबवावे लागले. यामुळे सुमारे चार तास कारखाना बंद राहिला. आता १७०० रुपये उचल म्हणून दिलेले आहेत. सरकारी नियमानुसार एफआरपीसह उर्वरित बिल देण्यास कारखाना बांधील असल्याचे पत्र कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक धनंजय व्यवहारे यांनी दिले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

मात्र, येत्या दहा दिवसांत एफआरपीसह वाढीव ऊसदर जाहीर न केल्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला. युटोपियन साखर कारखान्याने पहिली उचल प्रतिटन १७०० रुपये दिले आहेत. त्यामुळे एफआरपीसह वाढीव ऊसदरासाठी जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत होते. ते घोषणा देत होते. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत संघटनेचे अध्यक्ष देशमुख यांच्यासह कार्यकर्ते व शेतक-यांनी चालू गव्हाणीत उड्या टाकल्या. त्यामुळे कारखाना प्रशासनाला तातडीने गाळप बंद करावे लागले. परिणामी दुपारी चारपर्यंत कारखाना बंद राहिला.

संघटनेचे अध्यक्ष देशमुख म्हणाले, येत्या दहा दिवसांत सहकारमंत्री, साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन एफआरपी जाहीर करावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद पाडू. तसेच रस्त्यात ऊस वाहतुकीची वाहने आडवून जाब विचारण्यात येईल. युटोपियन कारखान्यासह जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी एफआरपीसह वाढीव दर जाहीर करावा. एफआरपीसह ती एकरकमी शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी. या आंदोलनात विकास जाधव, चंद्रकांत निकम, शिवाजी जाधव, रघू चव्हाण, किशोर दत्तू, युवराज घुले, आप्पा भुई, किसन जाधव, नामदेव काळे, महादेव गायकवाड, औदुंबर गायकवाड, श्रीकांत नलवडे, सर्जेराव गाडे, सुखदेव डोरले, बिरदेव ढेकळे, रमेश भगरे, सुनील पुजारी, शामराव पुजारी, पप्पू दत्तू, सुखदेव घोडके यांच्यासह शेतकरी सहभागी होते.

चालू गाळप हंगामात गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन १७०० रुपये दिले आहेत. ही रक्कम उचल म्हणून दिलेली आहे. सरकारी निर्णयानुसार एफआरपीसह होणारी उर्वरित रक्कम लवकरच देण्यास कारखाना बांधील आहे. त्यामुळे आंदोलन करावे, असे पत्र कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालक धनंजय व्यवहारे यांनी देशमुख यांना दिले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

तसेच रस्त्यात ऊस वाहतुकीची वाहने आडवून जाब विचारण्यात येईल. युटोपियन कारखान्यासह जिल्ह्यातील दहा कारखान्यांनी एफआरपीसह वाढीव दर जाहीर करावा. एफआरपीसह ती एकरकमी शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी. या आंदोलनात विकास जाधव, चंद्रकांत निकम, शिवाजी जाधव, रघू चव्हाण, किशोर दत्तू, युवराज घुले, आप्पा भुई, किसन जाधव, नामदेव काळे, महादेव गायकवाड, औदुंबर गायकवाड, श्रीकांत नलवडे, सर्जेराव गाडे, सुखदेव डोरले, बिरदेव ढेकळे, रमेश भगरे, सुनील पुजारी, शामराव पुजारी, पप्पू दत्तू, सुखदेव घोडके यांच्यासह शेतकरी सहभागी होते.

सर्वाेच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर ताशेरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या