24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरअश्लील व्हीडीओ लावून संबंध ठेवण्याची सक्ती, पतीवर गुन्हा दाखल

अश्लील व्हीडीओ लावून संबंध ठेवण्याची सक्ती, पतीवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अश्लील व्हीडीओ लावून पत्नीला त्याप्रमाणे संबंध ठेवण्यास सांगत, एका क्षणात तीन वेळा तलाक म्हणत तलाक दिल्याप्रकरणी रिक्षा चालक पतीवर मुस्लिम महिला संरक्षण कायदा कलमांअतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीच्या फिर्यादीवरून ही कारवाई झाली.

फिर्यादी महिलेचा आरोपीसोबत २०११ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर पतीने लग्नानंतर मासिक पाळी व गरोदर कालावधीमध्ये वेळोवेळी टीव्हीवर अश्लील व्हिडिओ लावून त्याप्रमाणे संबंध करण्यासाठी भाग पाडले. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत व्यवसायासाठी माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत पत्नीला त्रास दिला.

तसेच परस्त्रीशी संबंध ठेवून तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशाने सोमवार १८ जुलै रोजी तलाक कागदपत्रावर सही करण्यासाठी व माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच एका श्वासात तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे म्हणत तलाक दिला. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीवर मुस्लिम महिला संरक्षण कायदा कलम अंतर्गत व कौटुंबिक हिंसाचार कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई राठोड हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या