Thursday, September 28, 2023

माजी आमदार रमेश कदम यांना ६ वर्षानंतर जामीन

सोलापूर : बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी जामीन मंजूर केला.

दरम्यान, माजी आमदार रमेश कदम यांची आजी बायम्मा गणपत क्षीरसागर (रा. नांदणी, ता. बार्शी) हिच्या नावे दुग्धव्यवसाय करण्यासाठी बेकायदेशीररित्या कर्ज मंजुरीचे आदेश काढून ते वितरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला.

त्यातून शासनाची व महामंडळाची सहा लाख ३६ हजार ६५८ रुपयांची फसवणूक केली, अशा आशयाची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी ३१ मे २०१७ रोजी सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावेळी पोलिसांनी रमेश कदम यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी अ‍ॅड.. मिलिंद थोबडे यांच्या मार्फत जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे, तसेच कर्ज मंजुरीची रक्कम ही देखील लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला. तो युक्तिवाद ग्रा धरून न्यायाधीशांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रमेश कदम यांना जामीन मंजूर केला. अर्जदारतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे अ‍ॅड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.

अर्जाच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे, तसेच कर्ज मंजुरीची रक्कम ही देखील लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या