25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरवृृृध्दाकडून साडेचार लाख ऑनलाईन उकळले

वृृृध्दाकडून साडेचार लाख ऑनलाईन उकळले

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : मी महावितरण ऑफिसमधून बोलतोय, तुमच्या घराचे लाईट बिल भरले नसल्यामुळे वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहे असे सांगून एका ७७ वर्षीय वृद्ध पेन्शनर व्यक्तीला लिंक पाठवून बँक खात्यावरील ४ लाख ६१ हजार ५०० रुपये इतर अन्य खात्यामध्ये वळवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यातील फिर्यादी मधुकर वामन कुलकर्णी (वय ७७, सांगली सध्या सलगर बु) हे भूमी अभिलेख कार्यालय सांगली येथे नोकरीस होते. सध्या ते सेवानिवृत्त झाल्याने मूळ गावी सलगर बु. येथे आले आहेत. १३ जुलै रोजी फिर्यादीच्या मोबाईलवर राहुल शर्मा नामक इसमाने संपर्क साधून वीजबिल बाकी असल्याचे सांगितले. त्यासाठी फिर्यादीला लिंकही पाठवली. ती डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीच्या मोबाइलमधील एसबीआय युनो अ‍ॅपवर नियंत्रण मिळवून ४ लाख ६१ हजार ५०० रुपये इतकी रक्कम इतर

बँक खात्यामध्ये वर्ग करून फिर्यादीची फसवणूक केली. लाईट बिल जमा झाले की नाही हे तपासण्याच्या नावाखाली फिर्यादीचा युजर आयडी पासवर्ड विचारून घेतले. त्यानंतर संध्याकाळी ८ ते १० च्या दरम्यान फिर्यादीच्या मोबाइलवर पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला. तद्नंतर फिर्यादी मंगळवेढ्यातील स्टेट बँकेत जाऊन डिटेल्स तपासले असता खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचे समजले. तपास पोलीस निरीक्षक रणजित माने हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या