24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरमालवाहतूक रेल्वेची चार जणांना धडक, तिघांचा मृत्यू तर एका जखमी

मालवाहतूक रेल्वेची चार जणांना धडक, तिघांचा मृत्यू तर एका जखमी

एकमत ऑनलाईन

पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूरमध्ये रेल्वेने चार जणांना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मिरजहून कुर्डुवाडीकडे जाणा-या मालवाहतूक रेल्वे गाडीने बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता पंढरपूर येथे ४ जणांना धडक दिली. या अपघातात ३ जण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठार झालेल्यांची नावे समजू शकलेली नाहीत, मात्र हे सर्वजण बिहार, छत्तीसगड येथील रहिवासी असल्याचे समजते.

मिरजहून कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेली मालवाहतूक रेल्वे पंढरपूर येथे आली. दरम्यान पहाटे ४ वाजता नवीन कराड नाका परिसराजवळ असलेल्या पंढरपूर ते टाकळी दरम्यानच्या रेल्वे पुलावर ही घटना घडली. रेल्वेची धडक इतकी जोरात होती की, यात तिघांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात शरीराचे अवयव इतरत्र पडले. पहाटे झालेली घटना सकाळी स्थानिकांच्या लक्षात आली. याबाबत स्थनिकांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले आहे. तर मृतांचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे रुळावर दारूच्या बाटल्याही आढळल्या आहेत. त्यामुळे हे मजूर दारू पित बसले असताना हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खरच रेल्वे अपघात की घातपात की आत्महत्या, याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या