23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरएटीएम कार्डची अदलाबदल करून सव्वातीन लाखांची फसवणूक

एटीएम कार्डची अदलाबदल करून सव्वातीन लाखांची फसवणूक

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : अकलूज (ता. माळाशिरस) येथील मौलवी मोहम्मद अफजल हुसेन ( वय ४३) पंढरपुरातील एटीएममधून पैसे काढताना अज्ञात इसमाने मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलेले. इंग्लिश वाचता येत नसल्याने ते एटीएम कार्ड स्वत:चे आहे का किंवा इतर कोणाचे आहे हे त्यांना समजलेच नाही. त्यानंतर वेळोवेळी पैसे काढून एकूण ३ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

अकलूज येथील इदगाह मस्जिद, येथे मौलवीचे काम करणारे मोहम्मद अफजल हुसेन (वय ४३) हे कामानिमित्त पंढरपूर येथे आले होते. ते २५ डिसेंबर २०२१ रोजी पंढरपुरातील बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएममध्ये डेबिट कार्ड ने रक्कम काढण्यासाठी गेले. कार्ड एटीएममध्ये टाकून एकूण दहा हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसे निघाले नाहीत. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे दोन अनोळखी इसम होते. त्यांनी काय झाले? पैसे निघत नाहीत का? मी पैसे काढून देतो म्हणून त्यांचेपैकी एकाने हुसेन यांच्या हातातील एटीएम कार्ड घेतले.

मी देखील ते पैसे काढून देण्यास मदत करणार असल्याने त्याचेकडे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचा बहाणा करून, माझे डेबिट कार्ड हातचलाखीने बदलले. यामुळे त्यांच्याकडील दुसरे सारखेच डेबिट कार्ड हुसेन यांना दिले. त्यानंतर वेळोवेळी मोहम्मद हुसेन यांच्या बँक खात्यातून एकूण ३ लाख २२ हजार रुपये काढल्याचे हुसेन यांच्या मोबाईलवर मेसेज आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या