23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeसोलापूरदुधाची खोटी विक्री दाखवून ४२ लाखांची फसवणूक

दुधाची खोटी विक्री दाखवून ४२ लाखांची फसवणूक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दुधाची खोटी विक्री दाखवून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह त्यांच्या जोडीदाराने मिळून ४२ लाख ७३ हजार ३१७ रुपयाची फसवणूक केल्याची घटना दि.२२ जूलै २०२० ते ४ ऑगस्ट २०२० दरम्यान जिल्हा दूध उत्पादक ऑफिस मुरारजी पेठ सोलापूर येथे घडली.याप्रकरणी विनायक शिवाजीराव कदम (वय-५०,रा.भवानी पेठ, मराठा वस्ती,सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सतीश लिंबराज मुळे (रा.दावत चौक जुळे सोलापूर) व कालीका अमृत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे प्रोप्रा.बाळकृष्ण पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे व कालिका अमृत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे बाळकृष्ण पवार यांनी संगणमत करून ४२ लाख ७३ हजार ३१७ रुपयांची दुधाची खोटी विक्री दाखवून दोघांनी मिळून आर्थिक लाभ घेण्याकरिता संघाची फसवणूक करून नुकसान केली आहे.

तसेच सतीश मुळे यांची सोलापूर जिल्हा संघाच्या संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली असताना व संघाच्या हिताची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावर असताना त्यांनी संघाचा विश्वास घात करून स्वत:च्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक संघाचे नुकसान व्हावे म्हणून बाळकृष्ण पवार यांच्याशी संगनमत करून संघाचे आर्थिक नुकसान केले आहे.दरम्यान सतीश मुळे यांनी दि.२८ जुलै २०२० रोजी संचालक मंडळ सभेमध्ये विषय क्रमांक ६ चा ठराव झालेला नसताना तो झालेला आहे.असे दाखवून खोटे व बनावट रेकॉर्ड तयार केला त्यानंतर तो पुरावा म्हणून खरे आहे म्हणून वापरले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बरडे हे करीत आहेत.

मोफत पुस्तकांचा विषय यंदा ‘ऑक्सिजन’ वर!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या