26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeसोलापूरगजानन गुरव यांच्या बदलीचे हिंदु जनजागृृती समितीतर्फे स्वागत

गजानन गुरव यांच्या बदलीचे हिंदु जनजागृृती समितीतर्फे स्वागत

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनमानी कारभार करत भजन, कीर्तन आणि नामजप करण्यास बंदी घालणार्‍या सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची महाराष्ट्र शासनाने उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. गजानन गुरव यांनी कोणताही लेखी आदेश न काढता, बैठक न घेता, कोणालाही विश्वासात न घेता केवळ तोंडी आदेशाद्वारे अचानक श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तनावर बंदी घालण्यात आली होती.

याचा हिंदु जनजागृती समिती आणि समस्त वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध केला होता. देवस्थान समितीमध्ये विठ्ठलाचे भक्त अधिकारी-कर्मचारी असावेत आणि गजानन गुरव यांना मंदिर समितीतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली होती. ही मागणी शासनाने मान्य केली आणि आदेश काढून गुरव यांची या पदावरून हकालपट्टी केली.असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

मंदिरांच्या सरकारीकरणाचे आतापर्यंत अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. मंदिरांच्या देवनिधीमध्ये भ्रष्टाचार करणे, देवस्थानांच्या जमीनी लाटणे, देवतांच्या दागिन्यांमध्ये चोरी, मंदिराच्या प्रथा-परंपरा बदलणे अशा अनेक गोष्टी दिसून येतात. मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्याची मागणीही घनवट यांनी या वेळी केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या