26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरबेकायदेशीर डिझेल सदृश रसायन निर्मिती व विक्री करणारी टोळी जेरबंद

बेकायदेशीर डिझेल सदृश रसायन निर्मिती व विक्री करणारी टोळी जेरबंद

एकमत ऑनलाईन

सोलापूर : बेकायदेशीर रित्या डिझेल सदृश केमिकल पासून डिझेल निर्मिती व विक्री करणारी टोळी शहर गुन्हे शाखेने जेरबंद केली असून याप्रकरणातील एकूण ९ आरोपींना अटक करून 16 कोटी 19 लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांना 14 ऑक्टोंबर रोजी गोपनीय रित्या मिळालेल्या माहितीनुसार पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल समर्थ च्या जवळ उत्तरेस असलेल्या आकांक्षा लॉजिस्टिक या खाजगी बस पार्किंग च्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बस मध्ये कुठून तरी बेकायदेशीर मार्गाने चोरी करून आणलेला डिझेल सारखा ज्वलनशील द्रव पदार्थ टँकर क्रमांक एम.एच.25.ए.के.2417 मधून खाजगी बस क्रमांक एन एल ०१ बी 1687 मध्ये भरत असल्याचे माहिती मिळाली.त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणी एक डिझेल टँकर व तीन आकांक्षा लॉजिस्टिक च्या बसेस सह१ कोटी१ लाखकिंमतीचा मुद्देमाल जप्त केला व या प्रकरणात आकांक्षा लॉजिस्टिक कार्यालयातील मालक अविनाश सदाशिव गंजे,मॅनेजर श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण या दोघांसह बस चालक हजु लतीफ शेख,उस्मानाबाद. तसेच तानाजी कालिदास ताटे मानेगाव बार्शी,युवराज प्रकाश प्रबळकर सुधाकर सदाशिव गंजे यांना ताब्यात घेतले.

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात या सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान हिमांशू संजय भूमकर (वय-21 रा.भुमकर कॉलनी बार्शी रोड,वैराग) या इंजिनींिरग मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ आणण्याकरिता टँकर क्रमांक एम.एच.25 ए. के.2417 पालघरला पाठवला असल्याचे निष्पन्न झाले.त्याचा तत्परतेने शोध घेऊन त्याच गुन्ह्यात अटक करून अधिक माहिती विचारले असता त्यांनी तो डिझेल सदृश्य द्रव्यपदार्थ पालघर येथील साई ओम पेट्रोल स्पेशलिटी ऑफ लिमिटेड या कंपनीतून आणला असल्याचे सांगितले.त्यानुसार पोलिस उपायुक्त बापू बांगर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय साळुंखे व गुन्हे शाखेचे दोन पथक पालघर येथे रवाना झाले.तेथे त्या कंपनीस रिसायकल ऑइल व्यवसायाचा परवाना असताना ते केमिकल च्या साह्याने डिझेल तयार करून विक्री करत असल्याचे आढळून आले.या ठिकाणी कंपनीचे मालक व आणखी एकजण ,कंपनीची मशनरी मालमत्ता व जमीन असा सुमारे 16 कोटी 19 लाख 90 हजार किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला.या कंपनीने बेकायदेशीर डिझेल बनवण्यासाठी कोणकोणते केमिकल कुठून आणले यासंबंधी आता तपास सुरू असल्याचेही बांगर यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, नंदकिशोर सोळुंके, श्रीनाथ महाडिक, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, गुन्हे शाखेकडे अंमलदार सुहास आखाडे,दिलीप किर्दक,अशोक लोखंडे,अमित रावडे, इमाम इनामदार, अजय आडगळे, अजय पाडवी,संतोष मोरे, अंकुश भोसले,संतोष फुटाणे, संदीप जावळे, विजयकुमार वाळके, राजेश चव्हाण, श्रीकांत पवार, अनिल जाधव, शितल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, राहुल तोगे, कृष्णात कोळी,महेश शिंदे,तात्यासाहेब पाटील, शंकर मुळे, विद्यासागर मोहिते, कुमार शेळके,राजकुमार पवार,अंिजक्य माने,गणेश शिंदे, उमेश सावंत, राजू मुदगल आदी पथकाने पार पडली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या