सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला शहरातील गेंट्याल चौक येथे टेम्पोतून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विभागाने सापळा रचून टेम्पोतील गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्याचा एकूण रुपये ८ लाख ४० हजार ९६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
गेन्ट्याल चौक येथे संशयित टेम्पो अडवत पोलिसांनी शिवा बाबू राठोड (रा. विजापूर), इरेश गंगाधर नावडे (रा. भवानी पेठ) यांना विचारले असता त्यांनी गाडीत विदेशी दारू असल्याचे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे पाच ब्रँडचा साठा मिळून आला. यात ८ लाख ४० हजार ९६० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण ११० बॉक्स व वाहनासह , एकूण १४ लाख ४० हजार ९६० रुपये , किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर माळी याचा पोलीसांकडून शोध सुरु आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप,विभागीय उपआयुक्त अनील चासकर यांच्या मार्गदर्शनाखालीराज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मीक, उपअधीक्षक आदीत्य पवार, निरीक्षक मिसाळ व माळी, दुय्यम निरीक्षक भरारी पथक एस.ए.पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक होळकर जवान सावंत, ढब्बे, चेतन व्हनगुंटी, वाहनचालक दीपक वाघमारे व मदने यांनी केली आहे.