26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरबांधावर जाण्यावरून महिलेच्या मनगटावर वार

बांधावर जाण्यावरून महिलेच्या मनगटावर वार

एकमत ऑनलाईन

सांगोला : सामाईक बांधावरून शेतात जाण्या-येण्याच्या कारणावरून चुलत पुतण्यांनी मिळून मायलेकरास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गवत कापण्याच्या विळ्याने महिलेच्या डाव्या मनगटावर मारून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता त्यांना या बांधावरून पुन्हा गेल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली.

ही घटना ३० जून रोजी दुपारी १३.३० च्या सुमारास सांगोला तालुक्यात महीम येथे घडली. याबाबत जखमी सविता नवनाथ काटे (रा. तांदूळवाडी, ता. माळशिरस) हिने दोन पुतण्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, सविता काटे ही महिला ३० जून रोजी दुपारी महीम येथील शेतात कामासाठी सामाईक बांधावरून जात होती.

त्यावेळी पुतण्या सचिन काटे व राहुल काटे या दोघांनी मिळून चुलतीला आमच्या शेताच्या बांधावरून काय चालली आहेस, तुम्ही तुमच्या शेतातून जात जा म्हणत वेडेवाकडे बोलू लागले. दरम्यान, महिलेने शिव्या का देता, असे विचारले असता राहुल व सचिन काटे यांनी चुलतीला तुला लय मस्ती आली आहे म्हणत तिच्या अंगावर धावून आले.

त्यावेळी राहुलने त्याच्या हातातील गवत कापण्याचा विळा तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले. इतक्यात भांडणाचा आवाज ऐकून तिचा मुलगा विक्रम सोडवण्यासाठी मधे आला असता त्यास राहुल व सचिन काटे यांनी मारहाण करून पुन्हा बांधावरून गेल्यास तुमचे हातपाय मोडून टाकीन, अशी धमकी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या