सोलापूर : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मांडणीनंतर सोलापुरातील नागरिकांनी अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. त्यावर विविध स्तरातून विविध प्रक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने टरटए ला प्रोत्साहन देत देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठं योगदान दिले आहे. विशेषत: महाराष्ट्रात सर्वाधिक टरटए ने मोठ्या प्रमाणात कर्ज तरुणांना दिले आहे. उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद करत महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुद्धा ठोस पावले या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलली गेली आहे. नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. पुन्हा या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करत या सर्वस्पर्शी अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे मी अभिनंदन करत आहे.
तसेच शेतीमालाला दीडपट हमी भाव देण्याचे उदिष्ट यंदाच्या अर्थसंकल्पात ठरविण्यांत आले. गहु उत्पादकांना 75 हजार 60 कोटीच्या मदतीची तरतुद करण्यांत आली. तांदुळ खरेदीसाठी 1.7 लाख कोटीची तरतुद. फार्म क्रेडीटच उदिष्ट 16.5 लाख कोटी करण्यांत आली. रुरुल इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये 40000 कोटीची तरतुद. शहरी भागासाठी नवीन जलजीवन मिशनसाठी या नावाने पाणीपुरवठाकरीता पंचवार्षिक योजना घोषित करुन अनेक नागरिकांची म्हणजे राज्यातील 4378 अर्बन लोकल बॉडीस या भागात पाणी पुरवठा व्यवस्था होण्याकरीता सुमारे रु.2.87 लाख करोडची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे. स्वच्छ भारत मिशन पार्ट-2 अंतर्गत पंचवार्षिक योजनेसाठी रु.141678 करोडची तरतुद करण्यांत आली.
महाराष्ट्रातील नागपूर व नाशिक या शहरांच्या मेट्रोसाठी विशेष आर्थिक तरतूद केलेली आहे.विशेषत: ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्रासाठी 40 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने हमीभाव शेतक-यांना या अर्थसंकल्पातून मिळणार आहे. फिशिंग पोल्ट्री व डेरी या क्षेत्रासाठी फार मोठी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. खास करून कामगारांना किमान वेतन उपलब्ध करून देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. असंघटित क्षेत्रात काम करणा-या मजुरांना याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सरकारने कामगारांसाठी फार मोठा क्रांतिकारक निर्णय या अर्थसंकल्पात घेतलेला आहे. 15000 शाळांचा आधुनिकीकरण करून न्यू एज्युकेशन पॉलिसीचे सुरुवात करण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे.
संरक्षणाच्या तरतुदीत सलग सातव्यावर्षी वाढ
सर्वसमावेशक अर्थसंकल्प
शहरी भागासाठी नवीन जलजीवन मिशनसाठी या नावाने पाणीपुरवठाकरीता पंचवार्षिक योजना घोषित करुन अनेक नागरिकांची म्हणजे राज्यातील 4378 अर्बन लोकल बॉडीस या भागात पाणी पुरवठा व्यवस्था होण्याकरीता सुमारे रु. 2.87 लाख करोडची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे. स्वच्छ भारत मिशन पार्ट-2 अंतर्गत पंचवार्षिक योजनेसाठी रु.141678 करोडची तरतुद करण्यांत आली. यामुळे घनकच-याचा प्रश्न् सुटेल. सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासाठी गेल्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात दुप्पटीने अर्थसहाय्यची घोषणा सुमारे रु.15700 करोड ची तरतुद करण्यांत आली आहे.त्याचे आम्ही सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्यावतीने स्वागत करीत आहोत.
– राजू राठी (अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स)
विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न
कोरोना महामारी नंतर सावरण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार करून सादर केलेला अर्थसंकल्प. सर्वसामान्य आयकर दात्यांसाठी काहीही बदल नाही. परंतु ज्या कर दात्याचे वय 75 पेक्षा जास्त आहे त्यांना जर पेन्शन मिळत असेल तर पेन्शन वर आयकर लागणार नाही. सोपा सोपा म्हणत फार किचकट झालेला ॠरळ सोपा करण्याचा आश्वासन. पेट्रोल व डिझेल वर कृषी सेस लावणार त्यामुळे याचा फटका नकळत सर्वांच बसणार. अर्थ व्यवस्थेची विस्कटलेली घडी परत बसवण्याचा प्रयत्न.
-शैलेश सूर्यकांत चेट्टी (कॉस्ट अकाऊंट आणि कर सल्लागार, सोलापूर)
भारताला ‘आत्मनिर्भर’ बनविणारा अर्थसंकल्प
कोरोनाच्या या महाभीषण आर्थिक संकटातून मार्ग काढत सहा क्षेत्रावर लक्ष केंद्रीय केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला आहे. आरोग्य, आर्थिक पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास मानव संसाधन त्याचप्रमाणे नाविन्यता संशोधन मिनिमम गव्हर्मेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स या सूत्रावर आधारित हा अर्थसंकल्प माननीय केंद्रीय मंत्री यांनी मांडलेला आहे. कृषी क्षेत्रातील आर्थिक तरतूदही 2013च्या पेक्षा पाच पटीने जास्त तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या या मोठ्या प्रमाणात आर्थिक संपन्न होणार आहेत.
– खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी
व्यापा-यांचा घास हिसकावला
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या बजेटमध्ये फक्त लोकांचे तोंडे पुसण्याचे काम केलेले आहे. कोरोनामुळे व्यापारी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटी खाद्य तेलावरची माफ करायला पाहिजे होती ती माफ न करून अन्याय केला आहे.
– प्रकाश वाले (काँग्रेस शहराध्यक्ष)
दिलासादायक तरतुदी
कोरोनाकाळात झालेल्या आर्थिक अडचणीत कोणताही जादा टॅक्स लावला नाही ही दिलासादायक बाब आहे. राज्य सरकारला भरभरून मदत दिली. नाशिक व नागपूर मेट्रोसाठी सात हजार कोटीचे बजेट उपलब्ध करून दिले ही स्वागतार्ह बाब आहे.
– अविनाश महागावकर
(मा. संचालक, राज्य सहकारी बँक)
निराशाजनक अर्थसंकल्प
मोदी सरकारने २०२१ चा जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. महिलांसाठी कोणत्याही भरीव तरतुदी त्यात नाहीत. या बरोबरच नोकरदार, कष्टकरी वर्गाची तसेच शेतक-यांची या अर्थसंकल्पातून घोर निराशा झाली आहे.
– सायरा शेख (राष्ट्रीय सरचिटणीस,
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक)
देशाच्या विकासाला चालना देणारे अर्थसंकल्प
देशाच्या आत्मनिर्भयतेच्या परंपरेला अनुसरून देश आत्मनिर्भयतेकडे नेण्याचे धोरण अधोरेखित केलेले आहे. एकूणच देशाचा पाया असलेल्या कृषी क्षेत्र १६ लाख ५० हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत २७ लाख कोटी रुपये कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी खर्च केले आहेत. वित्तमंत्री सीतारामन यांनी कोविड अनुषंगाने नागरिकांच्या आरोग्यावर भर दिलेला दिसूनयेतो. जवळपास ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशामध्ये नवीन २८ हजार ग्रामीण व शहरी आरोग्य केंद्रे उघडण्यात येणार असून नव्याने १७ नॅशनल डिसीज सेंटर उघडण्यात येणार आहेत. आरोग्य संशोधनासाठी ३४ हजारकोटी रुपयांची तरतूद केली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून नव्याने ५०० अमृत शहरे सुरु होणार आहेत.
– श्रीकांत मोरे (अर्थतज्ज्ञ)
सर्व क्षेत्रांसाठी दिलासादायक बजेट
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले आजचे बजेट हे सर्व क्षेत्रातील लोकांसाठी दिलासादायक असे आहे. यामध्ये शेतकरी आणि तरुणांचा प्रामुख्याने विचार केला आहे. याशिवाय जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे आ. सुभाष देशमुख बजेटबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले. शेतक-यांना दीडपट हमीभाव देऊन दिलासा दिला आहे. तसेच सरकारी बँकांना 20 हजार कोटीचे अर्थसाहाय्य देऊन तरुणांसाठी उद्योगधंद्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय तरुणांना रोजगार मिळवा म्हणून 7 टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करून देशात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थची उभारणी करण्यात येणार आहे. शिवाय कोव्हिड लसीकरणासाठीही सुमारे 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– आ. सुभाष देशमुख
सर्वसामान्य जनतेला विश्वास देणारा अर्थसंकल्प
कोरोना मुळे उदभवलेल्या संकटावर मात करत त्यातून संधी शोधत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा संकल्प करत त्या संकल्प पूर्तीसाठी पावले उचलणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी कोरोनाची वॅक्सीन आल्यानंतर लोकसभेत सादर केला. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सार्थ ठरविणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला विश्वास देणारा आहे.
– आ विजयकुमार देशमुख