30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकाल

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकाल

एकमत ऑनलाईन

अकलूजचा गड आला पण सिंह गेला
अत्यंत चुरशीने झालेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवङणुकीमध्ये विजयंिसह मोहीते पाटील विकास पॅनलने पुन्हा एकदा सत्तेची सुञे जरी आपल्या हातात ठेवली असली तरी संग्रामंिसह मोहीते पाटील यांच्या पराभवामुळे त्यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.विजयंिसह मोहीते पाटील विकास पॅनलाच्या विरोधात डॉ. धवलंिसह मोहीते पाटील, फत्तेंिसह माने पाटील यांनी लोकनेते प्रतापंिसह मोहीते पाटील परीवर्तन आघाङी स्थापन करुन अकलूजकरांना सत्ता परीवर्तनाचे आवाहन केले होते. सुरुवातीला परीवर्तन आघाङीच्या उर्वशीदेवी मोहीते पाटील या बिनविरोध निवङुन आल्यामुळे मोठा हंगामा झाला होता. त्यानंतर विजयंिसह पॅनलच्या सर्व कारभा-यांनी १७ पैकी उरलेल्या सर्व जागा निवङुन आणण्यासाठी कंबर कसली.

संग्रामंिसह मोहीते पाटील यांच्या पराभवाची कारणमिमांसा करताना धैर्यशिल मोहीते पाटील म्हणाले, विरोधकांनी या वॉर्ङामध्ये अपप्रचार केला. नागरीकांना तुमची घरे येथुन काढली जाणार असल्याची भिती घातली. त्यांच्याकङुन या वॉर्ङामध्ये पैशांचे वाटपही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. विरोधकांनी प्रामाणिकपणे जर या वॉर्ङात निवङणुक लाढली असती तर त्यांचा पराभव अटळ होता. एकमेकांच्या नातेसंबंधातच लढल्या गेलेल्या या निवङणुकीकङे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहीले होते. तसेच या निवङणुकीला येणा-या नगरपालिकेच्या निवङणुकीची रंगित तालिम म्हणुनही पाहीले जात होते.

पंढरपूर तालुक्यात परिचारक, भालके, काळे गटांची सरशी
पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर परिचारक, भालके, काळे गटाचा झेंडा तर अनेक ठिकाणी अपक्षांना संधी तर पंढरपूर तालुक्यात अवताडे गटाचा प्रवेश झाला असून त्यांचे अनेक ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. सोमवारी मतमोजणीसाठी पंढरपूर येथे कार्यकर्त्यांनी तसेच उमेदवारांनी शासकीय गोदाम येथील मतमोजणी ठिकाणा समोरील रेल्वे मैदानात एकच गर्दी केली होती. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांकडून येथे गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला जात होता.

पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचे मतदान १५ जानेवारी रोजी झाले होते. त्याची मतमोजणी प्रक्रिया १८ जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिचारक,भालके, काळे,अवताडे गटाकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. तसेच अनेक परीचारक, भालके, काळे गटातील कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने वरील गटातील कार्यकर्ते अनेक ठिकाणी उभे होते. यामुळे अनेक ठिकाणी परिचारक, भालके, काळे विरुद्ध परिचारक, काळे, भालके गटातीलच कार्यकर्ते भिडले असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले होते. यामुळे निकालाच्या दिवशी सर्व ठिकाणचे निकाल हाती आल्यानंतर अनेक ठिकाणी परिचारक, भालके, काळे तसेच अवताडे गटाचे ही उमेदवार निवडून आल्याचे दिसून आले. मात्र अनेक ठिकाणी दिग्गज पुढा-यांना सत्ता गमवावी लागली आहे. यामध्ये सुस्ते येथे ४० वर्षांपासून सत्ता अबाधित ठेवणारे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्या गटाला सत्तेपासून लांब राहावे लागणार आहे.

करमाळा तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व अबाधित
करमाळा तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकित शिवसेनेची (बागल गट )सरशी झालेली दिसून येत आहे तर आ संजय(मामा)शिंदे व जगताप गट यांच्या युतीला ही ब-याच पैकी यश मिळाले आहे तर मा आ नारायण पाटील गटाला कमी अधिक प्रमाणात यश प्राप्त मिळाले आहे. करमाळा तालुक्यात नेरले, बाळेवाडी,सौदे,साडे, पागरे, शेटफळ ,देवळाली,वडगाव,पोथरे, मांगी,निमगाव पिपळवाडी,पांडे,पाडळी,कुगाव,सरफडोह,देवीचामाळ, मिरगव्हान, हिवरे ह्या ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे तर फिसरे या ग्रामपंचायत वर जिल्हा उपप्रमुख भरत आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकला आहे

तर आमदार संजयमामा व मा आ जयवंतराव यांच्या नेतृत्वाखाली मलवडी,बोरगाव,उमरड,जातेगाव,सावडी,घारगाव या ग्रामपंचायत वर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे तर मा आ नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवीटगाव,सांगवी,कोंडेज,आळसुंदे,ढोकरी,कुंभेज या ग्रामपंचायत वर झेंडा फडकला आहे.
तर केडगाव येथे योगेश बोराडे यांच्या नेतृत्वाखाली 7 जागा ंिजकून आपला अपक्ष झेंडा रोवला आहे तर झरे या ग्रामपंचायत वर प्रशांत पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला झेंडा रोवला आहे तर कुगाव येथे ही 7 उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत व 2 उमेदवार त्याच गटाचे विजयी झाले आहेत.

मोहोळ तालुक्यातील अनेक गावांत संमिश्र सत्तांतर
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 ते 21 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागला. एका मताने उमेदवार पराभूत झाल्याने एका मताचीकिंमत काय असते हे मतमोजणीच्या वेळी उमेदवाराला कळाले मोहोळ तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी हाती येतात विजयी उमेदवाराने आनंद उत्सव साजरा केला.ग्रामपंचायत ही गावचा विकास साधणारी गुरुकिल्ली आहे.गावाची सत्ता आपल्या ताब्यात राहावे यासाठी प्रयत्न ब-याच पुढारी व उमेदवारांनी केला होता.पण काही ची सत्ता हाता मधून निसटली आहे.मोहोळ तालुक्यातील ब-याच गावांमध्ये संमिश्र अशी सत्तातर झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवाला पसंती न देता नोटाला पसंती दिली आहे.मतमोजणीच्या वेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना अश्रू अनावरण झाले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या