23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home सोलापूर पालकमंत्री महाआघाडीचे की राष्ट्रवादीचे

पालकमंत्री महाआघाडीचे की राष्ट्रवादीचे

सोलापूर : महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जिवाचे रान करित आहेत. महाआघाडी जनतेसाठी कार्यरत आहेत. मात्र महाआघाडीची सत्ता येउन अनेक महिने उलटले तरी आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला कोणत्याच कामकाजात विचारात घेतले जात नसल्याची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

पालकमंत्री दत्ता भरणे हे आठवडयातून किमान दोन वेळा सोलापूरला येतात मात्र कधीच शिवसेनेला बैठकीला बोलवित नाहीत. आमचे म्हणणे ऐकूण घेतले जात नसल्याचे शल्य शिवसैनिकांना बोचत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जयंत पाटील आदी मंत्र्यांच्या दौ-यातही शिवसेनेला योग्य स्थान मिळालेले नाही. पालकमंत्री दत्ता भरणे हे अनुभवी नेतृत्व आहेत. सर्वांना बरोबर घेउन जातील अशी अपेक्षा होती मात्र तसे घडताना दिसत नाहीअशी तोफ शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यावर डागली आहे.

महाआघाडीचे सरकार आल्यावर दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या नंतर तिसरे पालकमंत्री म्हणून दत्ता भरणे यांनी कार्यभार स्विकारला. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय पातळीवरून विविध उपाययोजना करण्यासाठी बैठका आयोजित करण्यात येतात. यामध्ये पालकमंत्र्यांनी शिवसेना पदाधिका-यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांशी पालकमंत्र्यांनी समन्वय ठेवून विचार विनीमयाने जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे मात्र दत्ता भरणे यांचे सल्लागार हे सोलापूर जिल्ह्यातील नसून इंदापुरचे असावेत कारण काँग्रेस व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याशी माझा सातत्याने संवाद होत असतो.

अनेक आंदोलनेही तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे केली आहेत. मात्र पालकमंत्र्यांकडून शिवसेनेशी समन्वय ठेवण्यात दुर्लक्ष होत असल्याने शिवसैनिकामध्ये आपले म्हणणे ऐकले जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे. पालकमंत्री भरणे हे महाविकास आघाडीचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे.

Read More  बार्शी, सोलापूर रेशन दुकानात वितरण करण्यासाठी आलेला ११० टन तांदळाचा साठा जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow