प्रतिनिधी/सोलापूर
तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.दि.२० मे २०२२ रोजी रात्री सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकातील पोलिसांनी प्रोबेशनरी अधिकारी कार्तिक सत्य साई यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.जवळपास १ कोटी ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाकणी (ता.उत्तर सोलापुर) भागात पेट्रोंिलग करीत असताना सत्य साई कार्तीक यांना त्याचे गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की,तेरा मैल मंदुप येथुन कंटेनर क्रमांक एम.एच.४६ ए.एफ. ६११७ व एच.आर.३८-एक्स.८०५१ या दोन्ही वाहना मध्ये गुटखा भरुन ते तुळजापूरच्या दिशेने जात आहेत.ही दोन्ही वाहने पाकणी हद्दीत आली असता ती ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली.
डीबी पथक अंमलदार यांनी पाकणी येथील वासुदेव हॉटेल जवळ पकडुन दोन्ही वाहनांची कारवाई करण्यात आली.वाहनांत उपस्थित असलेल्या चालकांना सदर कंटेनर मध्ये काय आहे.याबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. ही कामगिरी तालुका पोलिसांनी केली. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली सत्य साई कार्तीक (भापोसे) परि. सहायक पोलीस अधीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे याचे नेतृत्वाखाली सपोनि प्रविण संपागे, पोहेकॉ संजय देवकर, पोना आनंत चमके, पोना नागेश कोणदे, पोना गणराज जाधव, पोकॉ रंिवद्र साबळे, पोकॉ यांनी बजावली आहे.