27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeसोलापूरचडचणहून येणारी गुटख्याची गाडी पकडली, १७ लाखांचा माल जप्त

चडचणहून येणारी गुटख्याची गाडी पकडली, १७ लाखांचा माल जप्त

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पो व १७ लाख ३२ हजारांचा गुटखा मंगळवेढा पोलिसांनी पकडला आहे. ही मोठी कारवाई पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाने केली आहे.

याप्रकरणी बाजीराव विष्णू बाबर (वय ३८, रा. आलेगाव, ता. सांगोला), दिलीप रामचंद्र मस्के (रा. मस्के कॉलनी सांगोला) गुटखा परवठादार श्रीशैल उर्फ अप्पू कलमनी, (रा. चडचण ता. चडचण, जि. विजयपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चडचण येथून छोट्या टेम्पोमधून गुटखा अवैधरीत्या घेऊन येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी तातडीने रस्त्यावर महमदाबाद हुन्नूर येथे ओढ्याजवळ सापळा लावला. यावेळी दि १४ रोजी सायंकाळी ६:४५ वाजता (एमएच ४५ एएफ ३१ ९१९९) हे वाहन थांबवण्यात येऊन चौकशी करता गुटखा अढळला. यावेळी यामध्ये १७ लाख ३२ हजारांचा विविध कंपनीचा गुटखा मिळून आला.

तसेच टेम्पो जप्त केला. अन्न औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात मुद्देमाल देण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाने कारवाई केली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या