26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeसोलापूरपरतीच्या पावसाचा मोहोळ तालुक्यात हाहाकार

परतीच्या पावसाचा मोहोळ तालुक्यात हाहाकार

एकमत ऑनलाईन

मोहोळ : मोहोळ सह तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने धुवाँदार बरसात केल्याने फळबागांसह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून एका ठिकाणी वीज पडून जर्शी गायीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . दरम्यान नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्तरावर दोन समित्या नेमल्या असून पंचनामे सुरू असल्याची माहिती मोहोळ तहसीलदार प्रशांत बेडसे – पाटील यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून मोहोळ तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे . महसूल विभागाच्या नोंदीनुसार मोहोळ तालुक्यात ५ ऑक्टोबर सकाळी सात वाजेपर्यंत २०.५५ मि.मी. च्या सरासरीने एकूण १६४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे महिन्याभरात चौथ्यांदा सीना नदीला पूर आला असून नदीकाठच्या शेती पिकात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे . तर सीना नदी वरील कोल्हापूर पद्धतीचे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत . आष्टे बंधा-यावर देखील पाणी असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . येणा-या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे . असल्यामुळे नदीकाठच्या गावांना वादळी वारा व मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे कोण्हेरी गावात वीज पडून प्रकाश बाबू तूप संिमदर या शेतक-यांची जर्सी गाई मृत्युमुखी पडली आहे . तर विवीशन अंबादास शेळके व अंिजक्य पांढरे यांच्या घरांची पडझड झाली असल्याचे समोर आले आहे . तर पेनुर गावातील रफिक शेख यांच्या डांिळब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोहोळ शहरालगत पंढरपूर रोडवर असलेल्या एका शेतक-याचा ऊसाचा फड जमीनदोस्त झाला आहे . तालुक्यातील देखील फळबागा व शेती पिकाच्या अन्य गावांत नुकसानाबरोबरच घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याच्या घटना घडल्या असून अद्यापर्यंत त्यांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे – पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले असून शेती पिकाच्या नुकसानाच्या पंचनाम्यासाठी तलाठी व कृषी सहायक यांचे पथक तर घरांच्या पडझडीच्या पंचनाम्यासाठी तलाठी , ग्रामसेवक जि.प. व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांचे पथक अशी एकूण दोन पथके नेमली आहे . त्यांच्या पंचनाम्याचे अहवाल आल्यानंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठविले जाणार आहेत . सध्या शेतक-यांच्या सोयाबीन , उडीद , तूर टोमॅटो , कांदा या पिकास सह डाळींब , पेरू , सिसिताफळ या फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे . तसेच ग्रामीण भागातील शेततळी तुडुंब भरले असून ओढे व नाले ओसंडून वाहत आहेत . त्यामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकरीचिंतातूर झाला आहे .

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या