सोलापूर : नांदवण्यासाठी प्रत्येक महिन्याला माहेरून ५० हजार तसेच फिरण्यासाठी कारची मागणी करत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सोनम सागर डोंगरे (वय ३४, रा. अन्नपूर्णा अपार्टमेंट, जोडभावी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सोनम यांचे दोन वर्षांपूर्वी सागर चरणदास डोंगरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर एक महिने कुटुंबीयांनी चांगले नांदविले. त्यानंतर मात्र सोनम यांना शारीरिक मानसिक त्रास देऊन उपाशी ठेवून जाचहाट करू लागले. त्यानंतर व्यवस्थित नांदवण्यासाठी प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपये, राहण्यासाठी फ्लॅट व फिरण्यासाठी एक चारचाकी गाडीची मागणी केली शिवाय फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती सागर चरणदास डोंगरे, सासरा चरणदास लक्ष्मण डोंगरे, सासू कल्पना चरणदास डोंगरे, नणंद कोमल चेतन धोत्रे, कल्याणी चरणदास डोंगरे ( सर्व रा. बालाजी पार्क, बाणेर पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पैकेकरी करत आहेत.