20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home सोलापूर दिल्लीच्या पराभवाची हॅट्ट्रिक; हैदराबाद चे उर्वरित दोन्ही सामने उपान्त्यपूर्वच

दिल्लीच्या पराभवाची हॅट्ट्रिक; हैदराबाद चे उर्वरित दोन्ही सामने उपान्त्यपूर्वच

एकमत ऑनलाईन

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत बाद फेरीतील प्रवेश.करु पाहणाऱ्या दिल्ली संघाला त्या वाटेवर आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. आणि पराभवाची हॅट्रिक पूर्ण झाली. पंजाबन दिल्लीला पाच गडी राखून दुबईत ,कलकत्ता ने ५९धावान अबूधाबी वर व आज हैदराबादन८८ धावानी दुबईत पराभूत केले स्पर्धेतील आव्हान कायम राहण्यासाठी जर-तरच्या समीकरणावर अवलंबून असणाऱ्या हैदराबाद संघाने त्यांचा ८८ धावांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे दिल्लीची धावगती एकदम ढासळली दिल्लीचे चौदा गुण झाले असले तरी धावगती (+०.०३०) तिसऱ्या क्रमांकावर आली.

दिल्ली व हैदराबाद संघांचे मुंबई आणि बेंगलोर बरोबरचे सामने शिल्लक आहेत दिल्लीचे चौदा गुण असल्याने त्यांना एखादा विजयही प्ले ऑफ मध्ये नेऊ शकेल पण हैदराबादला मात्र डु आँँर डाय अशी परिस्थिती आहे मुंबई बेंगलोर बरोबर चे हैदराबाद चे दोन्ही सामने उपांत्यपूर्व सामन्या सारखे खेळावे लागतील दोघांवर विजय मिळवावाच लागेल तरच बाद फेरीच दर्शन हैद्राबाद ला होईल.

नाणेफेक हरल्यानंतरही हैदराबादला दुबईत दिल्ली न प्रथम फलंदाजी दिली. त्याचा फायदा उठवताना त्यांनी २० षटकांत २ बाद २१९ धावा केल्या.बर्थडे बाँय वॉर्नर ची फटकेबाजी आणि साहाची त्याला मिळालेली साथ यामुळे त्यांचे आव्हान उभे राहिले. गोलंदाजीतील अनपेक्षित अपयशानंतर दिल्लीच्या फलंदाजांनीही कच खाल्ली. त्यांचा डाव १९ षटकांत १३१ धावांत संपुष्टात आला. हैदराबादसाठी आजच्या सामन्यातून गमावण्यासारखे काहीत नव्हते. तर, दिल्लीला बाद फेरी गाठण्यासाठी एक विजय आवश्यक आहे. या दोन गोष्टींचाच परिणाम आजच्या खेळावर दिसून आला. हैदराबाद काही गमावण्यासारखे नसल्यामुळे बिनधास्त खेळले. त्याचवेळी दिल्लीने अनाकलनीय सावधपणाने खेळ केला.

प्रथम फलंदाजी करताना आज हैदराबादने ताबडतोड फलंदाजी केली. याची सगळी जबाबदरी प्रथम डेव्हिड वॉर्नरने घेतली होती. नंतर ती भूमिका वृद्धिमान साहाने निभावली. हे सगळे अतर्क्य होतं. पण, टी २० क्रिकेटला शोभणारे होते. आव्हानात फारसा दम नसताना हैदराबादने आज संघात बेअरस्टो ऐवजी वृद्धिमान साहाला संघात स्थान दिले आणि प्रथम फलंदाजी मिळाल्यावर सलामीला खेळण्याची संधी दिली. वॉर्नर आणि साहा यांनी पॉवर प्ले मध्ये यंद्याच्या आयपीएलमधील सर्वाधिक ७७ धावांची लूट केली. वॉर्नरचा धडाका होता, पण त्याला साहाची देखील तशीच साथ होती.

वॉर्नरची आक्रमकता सर्वांना माहित होती. मात्र, साहाचे नवे रुप बघायला मिळाले आणि सचिन तेंडुलकरनेही ट्विटकरून साहाच्या आक्रमकतेचा विसर पडल्याचे स्मरण करून दिले. वॉर्नरने ३४ चेंडूंत आठ चौकार व दोन षटकारांसह ६६ धावांची खेळी करताना साहासोबत १०७ धावांची सलामी दिली.वॉर्नर बाद झाल्यावर साहाने मनीष पांडेच्या साथीत दे दणादण फलंदाजी करताना २९ चेंडूंतच ६३ धावांची भागीदारी केली. साहा ४५ चेंडूंत बारा चौकार व 2 षटकारासह ८७ धावांची खेळी करून बाद झाला. खरेतर त्याला शतक करण्याची चांगली संधी होती त्यानंतर मनीष पांडेने(नाबाद ४४) उर्वरित काम चोख बजावले आणि केन विल्यम्सनच्या साथीत नाबाद ४९ धावांची भागीदारी करताना हैदराबादचे आव्हान भक्कम केले. या सामन्यात दिल्लीचे क्षेत्ररक्षणही वाखाणण्यासारखे नव्हते.

आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या चेंडूपासून दिल्लीचे फलंदाजीतील फासेही उलटे पडू लागले. शिखर धवन खाते न उघडताच बाद झाला. गोलंदाजीची लय बिघडलेल्या दिल्लीच्या फलंदाजीचाही सूर बेसूर झाला . बढती मिळालेले मार्क्स स्टोईनिस, शिमरन हेटमेर स्थिरावण्यापूर्वीच बाद झाले. अजिंक्य रहाणे(२६) फॉर्मात आल्यासारखे वाटले. अर्थात ते ही एक मृगजळच ठरले. रशिद खानची फिरकी सुरू झाल्यावर दिल्लीच्या फलंदाजांना उभे राहणेही कठिण गेले. त्याने मधली फळी कापून काढल्यावर नटराजन, होल्डर यांनी उर्वरित काम पूर्ण केले. रिषभ पंतच्या(३६) तिशीतल्या खेळीने त्यांना ६ बाद ८३ नंतर शंभरी गाठणे तरी शक्य झाले. तेसुद्धा सोळाव्या षटकात नटराजन ला मारलेला पंत एका धावेवर असताना त्याचा कवर ड्राईव्ह अभिषेक शर्मा ला झेलता आला नाही म्हणून. रशिद खानने यंदाच्या मोसमात प्रथमच भेदकता दाखवताना ७ धावांत तीन गडी बाद केले.

ओंगळवाणा चेहरा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या