22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसोलापूरइन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाखांला घातला गंडा

इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाखांला घातला गंडा

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळवून देतो म्हणून ८१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते १४ एप्रिल २०२२ दरम्यान चाटी गल्ली सोलापूर येथे घडली.याप्रकरणी विजयकुमार व्यंकटेश विटकर (वय-३८,रा.भवानी पेठ,मड्डी वस्ती,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून कृष्णा (पुर्ण नाव माहीत नाही), मनीष ठाकुर,ब्रिज मोहन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी विटकर यांनी सन २०१४ मध्ये सोलापूर येथे आयसीआयसीआय बँकेमधून मॅक्स लाइफ इन्शुरन्सची पॉलिसी काढली होती.त्या पॉलिसीचा हप्ता वर्षाला २४ हजार रुपये भरत होते.त्यानंतर फिर्यादी विटकर यांनी सुमारे तीन वर्षे पॉलिसीचे हप्ते भरले.परंतु त्यानंतर पैसे भरणे बंद केले होते.दि.२१ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून ते दि.१४ एप्रिल २०२२ रोजी दरम्यान वरील संशयित आरोपी यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक ८७४२९४५१४७,७५३४९५६११६, ९९५३२८९३४१ या मोबाईल क्रमांकाच्या धारकाने एस बँकेत खाते क्रमांक ००१६८५८००००२१७४ या क्रमांकाचा धारक असे संगणमत करून फिर्यादी विजयकुमार विटकर यांना इन्शुरन्स पॉलिसीचे एक कोटी नऊ लाख रुपये मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर ती रक्कम प्राप्त करून न देता व फिर्यादी कडून वरील संशयित आरोपींनी फिर्यादी विटकर यांची वेळोवेळी प्रोसेंिसग फी,कोड चार्जेस,ट्रान्सफर चार्जेस अशी वेगवेगळी कारणे सांगून विश्वासाने घेतलेली एकूण ८१ लाख ३९ हजार रुपये रक्कम परत न करता ती स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या