24 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeसोलापूरवडिलांच्या अस्थी नदीत विसर्जन न करता त्यांनी लावले झाड

वडिलांच्या अस्थी नदीत विसर्जन न करता त्यांनी लावले झाड

एकमत ऑनलाईन

करमाळा : येथील हभप महादेव महाराज अभंग यांनी आपले वडील भानुदास जनार्धन अभंग यांच्या निधनानंतर तिस-या दिवशी दि.४ रोजी अस्थी नदीच्या पाण्यात विसर्जन न करता आपल्या शेतात एक नारळाचे झाड लावून ती अस्थी त्या नारळाच्या झाडाला घालण्यात आली. कोर्टी येथील भानुदास जनार्दन अभंग वय वर्षे ९२ यांचे दि. २मे रोजी पहाटे ४.१५ वा. वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.

त्यांना महादेव, रोहिदास, अंकुश ही ३ मुले आणि छबुबाई बनकर रा. मोशी एक मुलगी होत. ह.भ.प. महादेव अभंग हे भजन गायक, किर्तनकार, प्रवचनकार आहेत. त्यानी व भावंडांनी नेहमीच्या परंपरेला छेद देऊन वडिलांची अस्थी नदीमध्ये न टाकता, त्यांचे स्मरणार्थ नारळाचे झाड लावून खड्ड्यांमध्ये अस्थी व माती मिसळून टाकली.एक वेगळा पायंडा त्यांनी पाडला . याप्रसंगी ह. भ.प. बाबामहाराज हगारे, निलकंठ अभंग, बापू आखाडे, सुभाष अभंग, भागवत अभंग, लक्ष्मण अभंग, मारुती अभंग आणि नातवंडे व सुना उपस्थित होते.

याच कुटुंबियांनी गतवर्षी म्हणजे दि. २६ नोव्हेंबर २०२० मयत भानुदास अभंग यांच्या पत्नी कै. रुक्मिणी अभंग यांचे निधनानंतर देखील या भावंडांनी आपल्या मातोश्रीच्या अस्थी नदीत न टाकता त्यांचे स्मरणार्थ अशाचप्रकारे आंब्याचे झाड लावले आहे व ते चांगल्याप्रकारे जतन केलेले आहे. हीच परंपरा कायम ठेऊन अस्थी नदीमध्ये न टाकता पाणी दुषीत करण्याचे थांबवून पर्यावरण रक्षण हा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

दुस-या लाटेचा उद्योगांना फटका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या