26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसोलापूरमुलीशी भांडण का करतो म्हणत जावयाला डांबून ठेवले

मुलीशी भांडण का करतो म्हणत जावयाला डांबून ठेवले

एकमत ऑनलाईन

सांगोला : मुलीशी भांडण का केले म्हणून संतापलेल्या सासू सासऱ्यांनी जावयाला पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर त्यास दुचाकीवर बसवून नेले व त्यांच्या घरी ८ दिवस डांबून ठेवले. ही घटना २३ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेगाव, ता. सांगोला येथे घडली. याबाबत जितेंद्र मवाली शिंदे (रा. आलेगाव) याने शुक्रवार, दि. १ जुलै रोजी सासू, सासरे, मेहुण्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

शिंदे याचे १९ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पत्नी मनीषा हिच्यासमवेत मुलाला घेरडी येथे शाळेत घालण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून पत्नी मनीषा अरबळी (ता. मोहोळ) येथे तिच्या माहेरी निघून गेली होती.

त्यानंतर दोन दिवसांनी मेहुणा व सासऱ्याने फोन करून त्यास कशाला भांडण केले, तुम्ही इकडे या आपण भांडण मिटवू असे म्हणाले; परंतु कामामुळे तो गेला नाही. त्यानंतर २३ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो घरी असताना सासरे समाधान काळे, मेहुणे अमोल काळे, अभिमान काळे, राहुल काळे व सासू पारूबाई काळे, जितेंद्र शिंदे याच्या घरी आले. सासरे समाधान काळे याने तू माझ्या मुलीसोबत भांडण करून मारहाण का केली

. मेहुणा अमोल काळे व अभिमान काळे याने तलवारी पट्ट्याने त्याला मारहाण केली. आमच्याकडे चल तिथे काय असेल ते मिटवू, असे म्हणून त्याला अरबळी येथे नेऊन तेथेच ८ दिवस घरी डांबून ठेवल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या