25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeसोलापूरपाण्याने वेढलेल्या गावात बोटीने जाऊन केली १३८ ग्रँम सोन्याची चोरी

पाण्याने वेढलेल्या गावात बोटीने जाऊन केली १३८ ग्रँम सोन्याची चोरी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान कोसळलेल्या जोरदार पावसांच्या सरी मुळे गावाला पाण्याने वेढा घातला असता या संधीचा फायदा घेत गावातील तीन तरुणांनी बोटीतून जाऊन चोरी केली. दरम्यान चोरीतील सोने विक्री करून कायमस्वरूपी कोकणात वास्तव्य ठोकण्याच्या विचारात असलेल्या चोरट्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बाळू औदुंबर डिरे,बालाजी परसे व अंकुश मोतीराम सल्ले सर्व रा.मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.१५ ते १७ ऑक्­टोबर दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात मोठा धुवाधार पाऊस पडला.या पावसात अनेकांचे मोठे नुकसान झाले अनेक गावांना पाण्याने वेढा दिल्याने संपूर्ण गावे निर्मनुष्य झाली.त्याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावालाही पाण्याने वेढा दिला होता.सुरज रावजी कापसे यांच्या घरात सीना नदीचे पाणी शिरले त्यामुळे घर बंद करून ते कुटुंबातील इतर सदस्यसह दुसरीकडे राहण्यास गेले.

त्याच दरम्यान आरोपींनी कापसे यांना बोटीतून घेऊन गावातील फेरफटका मारला.यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या घरातील ऐवजाचा अंदाज घेतला.कापसे यांना सोडून आल्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरात पाण्यातून पोहत जाऊन प्रवेश केला. आरोपीने घराच्या दुस-या मजल्यावर असलेल्या कपाटाचा कडी-कोयंडा उचकटून आतील दागिने चोरले. यामध्ये विविध प्रकारच्या दागिन्यांचा समावेश असून सर्व दागिने १४ तोळे होते.या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले.या पथकांना मिळालेल्या माहितीनुसार गावातीलच तीन तरुणांनी चोरी केली असल्याची माहिती पुढे आली.पथकाने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले.त्याच दरम्यान तीनही चोरटे चोरीतील सोन्याचे दागिने घेऊन पुणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली.

पुणे रोडवरील वडकी वस्ती येथे पुणे येथे जाण्यासाठी हे तीन तरुण थांबले असता,पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.त्यांच्या अंगझडती मध्ये मिळालेल्या दागिन्यांची चौकशी करताच त्यांनी मनगोळी येथे चोरी केल्याची कबुली दिली.ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर, पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खाजा मुजावर,पोलीस हवालदार राजेश गायकवाड,नारायण कोलेकर,दिलीप राऊत,धनाजी गावडे,मोहन मंदावले, अक्षय दळवी व समीर शेख यांनी केली.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या