22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरकरमाळ्यात मुख्याध्यापकाची रेल्वेखाली आत्महत्या

करमाळ्यात मुख्याध्यापकाची रेल्वेखाली आत्महत्या

एकमत ऑनलाईन

करमाळा : येथील नगरपरिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने अज्ञात कारणाने रेल्वे समोर उभे राहत आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्घटना करमाळ्यात उपडकीस आली आहे. करमाळा नगरपरिषदेच्या इतर शाळांनी शाळेला सुटी दिली होती.

ही घटना रविवारी मध्यरात्री पोफळज शिवारात रेल्वे रुळ ३३६/२० ते ३३६/२२ या दरम्यान घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

किशोर अनंतराव भागवत (वय ४८ रा. शाहू नगर करमाळा, ता. करमाळा असे मृताचे नाव आहे. पोफळज ता. करमाळा येथील कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया भागवत यांचे ते पती होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, किशोर भागवत यांना मागील दिवसांत कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान झाले होते.

त्यावर त्यांनी यशस्वीरीत्या मातही केली होती. शनिवारीच मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली होती. रविवारी मध्यरात्री पोफळज येथील रेल्वे रुळाजवळ एका अज्ञात व्यक्तीचे मृत शरीर पडलेले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने करमाळा पोलिसांना कळवली. त्यावेळी पोलिस नाईक मनोज खंडागळे काही मदतनीस सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले.

छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्याने मृत शरीराजवळ पाहणी केली त्यावेळी भागवत यांचा मोबाइल व एटीएम कार्ड मिळून आले त्यावरून त्यांचा तपास लागला. कुटुंबीयांना ओळख पटवण्याकरिता बोलवण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या