19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeसोलापूरडोळ्यांचे ऑपरेशनसाठी अवर ओन फाऊंडेशन तर्फे मदत

डोळ्यांचे ऑपरेशनसाठी अवर ओन फाऊंडेशन तर्फे मदत

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : येथील अवर ओन फाऊंडेशन यांचेवतीने टेंभुर्णी येथील रहिवाशी असलेल्या शकुंतला उद्धव नाईकनवरे यांचे डोळ्यांचे ऑपरेशनसाठी सात हजार ची मदत देण्यात आली आहे.हे कुटुंब गरीब परिस्थिती असल्याने शकुंतला यांना मदतीची गरज होती.घरची परिस्थिती हलाकीची असल्याने व घरी कोरोना मुळे घरच्या लोकांना हाताला काम नसल्याने ऑपरेशन करण्यासाठी अडचण येत होती. ही माहीती समजल्यावर फाऊंडेशनचे वतीने त्यांना आज सात हजारांची मदत केली असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर जहागीरदार यांनी सांगितले.

अवर ओन फाऊंडेशनचे वतीने गेली दिड वर्षात ५ लाखांची एकुण मदत करण्यात आलेली आहे.फाऊंडेशनचे कार्यषेत्र संपूर्ण देशात असुन हळूहळु महाराष्ट्र व महाराष्ट्रचे बाहेर देखील फाऊंडेशनचे काम वाढवणार असुन अनेक समजोपयोगी योजना राबवणार असल्याचे जहागीरदार यांचे मानस आहे.

या पुर्वी देखील अवर ओन फाऊंडेशनचे वतीने २० गरीब विध्यर्थी यांना सायकलचे वाटप,गरीब २० विध्यर्थी यांना एंड्रॉईड मोबाईलचे वाटप,बीड येथील गरीब विध्यर्थीला २० हजारांची मदत,ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशनसाठी २५ हजारांची मदत,पर प्रांतीय ४० कुटुंबाला ३० किलो गहू व ५ किलो तांदूळचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी अवर ओन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अनिल जगताप, निखिल खरात, संतोष सोनवणे आदी जण उपस्थित होते. यापुढे देखील फाऊंडेशनचे काम राहणार असल्याचे बशीर जहागीरदार यांनी सांगितले आहे.

निकृष्ट व ओढा खोलीकरण, सरळीकरण व्यवस्थित न झाल्यामुळे शेतीचे नुकसान

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या