करमाळा : आजारी मेव्हण्याला मोटारसायकलवर रुग्णालयात घेऊन जाताना समोरून येणाऱ्या टमटमने जोराची धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या भावजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बाबासाहेब मधुकर पवार (वय ४४, रा. वडशिवणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बिनगेश रुब्ब्या काळे असे या अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या पवार यांच्या भावाने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वडशिवणे ते कंदर रस्त्यावर टाकळाबाई देवी मंदिर परिसरात दि. ६ जून रोजी हा अपघात झाला.
यामध्ये बप्पा मधुकर पवार (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, माझा लहान भाऊ बाबासाहेब मधुकर पवार (वय ४४) हा मोलमजुरी करुन उपजीविका चालवत होता. दि. ६ जूनला सकाळी तो व मेहुणा बिनगेश रुब्ब्या
काळे हे मोटारसायकलवर आजारी असलेल्या मेव्हणा बिनगेश काळेला कंदर येथे रुग्णालयात घेऊन जात होता. त्यानंतर साडेदहा वाजताच्या सुमारास वडशिवणेच्या पुढे कंदरला जाणाऱ्या रस्त्यावर टाकळाबाई देवी मंदिराच्या पुढे कंदरकडून वडशिवणेकडे येणाऱ्या टममटने ( चारचाकी गाडी) त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली.
यात ते दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने इंदापूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून भावाला सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले. तेथे बाबासाहेब पवार याच्यावर उपचार सुरू असताना रात्री १० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करून वडशिवणे ते अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर ८ तारखेला त्यांनी फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.