24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरकारला धडक; पाच जण जखमी

कारला धडक; पाच जण जखमी

एकमत ऑनलाईन

सांगोला : कोल्हापूर येथून गणपतीची मूर्ती घेऊन येताना बंद पडलेल्या कारला पाठीमागून येणा-या दुस-या भरधाव कारने धडक दिली. अपघातात दोन्ही कारमधील चालकांसह पाच जण जखमी झाले, तर अपघातग्रस्त कारमधील गणपती मूर्तीचा भंगली. दोन्ही कारचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले.

हा अपघात सोमवार, ८ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास सांगोला-मिरज रस्त्यावरील उदनवाडी पुलावर घडला. याबाबत अभिजीत मारुती घाडगे (रा. जिल्हा बँकेजवळ, विजापूर, कर्नाटक) यांनी कारचालक आकाश सदाशिव विभूते (रा. बोंबेवाडी, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. विजापूर येथील अभिजित मारुती घाडगे, अभिषेक जाधव, शरद चव्हाण व सागर कुलकर्णी हे ७ ऑगस्ट रोजी एमएच १३/ सीके ०५९२ या कारमधून सोलापूरहून कोल्हापूरला गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेले होते.

तेथून मूर्ती खरेदी करून भाड्याने केलेल्या वाहनात मूर्ती भरून सोलापूरला पाठवून दिली. कोल्हापूर येथून चौघेजण रात्री ७.३० च्या सुमारास मिरजमार्गे विजापूरला जात असताना हायवेवरील उड्डाणपुलामुळे नागजमधून जतला वळण्याऐवजी रस्ता चुकल्याने, तसेच पुढे नाझरेमठ (ता. सांगोला) पर्यंत आले. रस्ता चुकल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर पुन्हा परत येत असताना हा अपघात घडला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या