34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeसोलापूरमोहोळ तालुक्यातील वाळू माफियांना दणका

मोहोळ तालुक्यातील वाळू माफियांना दणका

एकमत ऑनलाईन

मोहोळ (राजेश शिंदे) : जि .पो.अ. तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या .गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की , मौजे आष्टे ता . मोहोळ जि . सोलापूर येथील सीना नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी विशेष पथकातील सहा . पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. सहा . पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह मौजे आष्टे ता . मोहोळ जि . सोलापूर येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून सिना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले . त्यावरून वाळू उपसा पाँईंटची खात्री झाल्यानंतर पाँईंट पासून काही अंतरावर असलेल्या पिकामध्ये मध्यरात्री पोहचून पिकात पथक दबा धरून बसले असता पहाटेच्या सुमारास काही वाहने वाळू भरण्यासाठी पॉईंटवर आले व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना १२ इसमांना गराडा घालून पकडले व काही इसम पळून गेले.

संशयित आरोपीचे नावे – संतोष ब्रम्हदेव आरकिले वय ३५ रा.शेगांव दुमाला ता . पंढरपूर जि . सोलापूर, समीर लक्ष्मण माशाळ , वय २५ रा . आष्टे ता . मोहोळ जि . सोलापूर ,रामचंद्र अर्जुन नरोटे वय २० वर्षे रा.आष्टे ता . मोहोळ जि . सोलापूर , समाधान शेकप्पा शिवशरण वय २६, आप्पा श्रीरंग मोरे वय ४६ रा . नजीकंिपपरी, दिनकर अंबादास वाघमोडे , वय २५रा . नजीकंिपपरी , विलास हुकूम वाघमोडे वय ३०, सदशिव महादेव वाघमोडे वय ४५, पोपट शिवाजी वाघमोडे वय २१ , बजरंग षिवाजी मोरे वय ५२, उत्तम बलभिम वाघमोडे वय ५० अ.नं ४ ते ११ सर्व रा . नजीक पिंपरी ता.मोहोळ जि . सोलापूर , दत्तात्रय प्रल्हाद चव्हरे वय ४० रा . मोहोळ , बापू खरात रा.आष्टे ता . मोहोळ , राहूल खरात, वाहन मालक अच्युत गायकवाड रा . मोहोळ , सिकंदर धोत्रे रा . मोहोळ , दीपक बाळासाहेब झेंडगे रा . मलकाची ंिहगणी ता . मोहोळ जि . सोलापूर .वाळू पॉईंटच्या ठिकाणाहून १ ट्रॅक्टर , यारी मशिन संच , ०५ हॅड्रोलिक टेम्पो ट्रक असे एकूण ३५ लाख ३ हजार २०० रू .किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण १२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे . सदर बाबत मोहोळ पोलीस ठाणे गुरंन ००/२०२१ भादविकाक ३७९,३४ पर्यावरण कायदा १९८६ चे कलम ९ व १५ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे .

‘लाऊड स्पीकर’ने होतेय रब्बी ज्वारीची राखण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या