23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home सोलापूर सांगोला येथे वीज बिलाची होळी

सांगोला येथे वीज बिलाची होळी

एकमत ऑनलाईन

सांगोला (विकास गंगणे) : लाकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला भरमसाठ बीज बिले देण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे . सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी सोमवार २३ नोव्हेंबर रोजी भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर , मुख्य चौकात वीज बिलांच्या होळीचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे . सर्वच बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरले असून प्रत्येक विषय केंद्राच्या माथी मारण्याचा एककलमी कार्यक्रम आघाडी सरकारने चालवला आहे. लॉकहाऊन काळात विजेची वारेमाप बिले दिल्याने शेतकरी , व्यापारी , लघु उद्योजक , घरगुती ग्राहकांमध्ये या सरकारबद्दल आक्रोश निर्माण झाला असून जनतेला दिवाळी ऐवजी बोंबाबोब करून शिमगा करण्याची वेळ आली आहे. वीज बिले माफ करावीत यासाठी भाजपच्या वतीने यापुर्वी दोन वेळा आंदोलन करण्यात आले होते.

मात्र राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही . लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला भरमसाठ वीज बिले आली . लॉकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने वीज बिलांचा शॉक दिला आहे . वीज बिलात सवलत देण्याचे सरकारने जाहीर केले होते . मात्र ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात दिलासा देता येणार नसल्याचे जाहीर करत वीज बिले जनतेला भरावीच लागतील असे स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे . सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी आणि भरमसाठ वीज बिलांबाबत जनतेला सवलत देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने सोमवार २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व महावितरण कार्यालयासमोर व तालुक्यातील मुख्य चौकात वीज बिलांच्या होळीचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिली आहे.

मोहोळ येथे भीषण अपघात ; कंटेनर व टँकर जळून खाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या