सोलापूर: पूर्वी होळीचा सण आला म्हटले की अवतीभोवतीचा लाकूडफाटा गोळा करायचा. लाकूड अड्डेही सुटायचे नाहीत. होळीत जाळण्यासाठी मोठा वापर व्हायचा. मात्र, आता गॅसचा जमाना आल्यामुळे लाकूड अड्ड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. दारापुढे गोवऱ्या विकत घेऊन हा उत्सव साजरा होऊ लागला आहे. शहरांमध्ये केवळ स्मशानभूमी अन् थोडाफार कार्यक्रमांसाठीच काय तो लाकडांचा वापर होऊ लागला आहे. शहरात आता केवळ १५ ते २० लाकूड अड्डे उरले आहेत.
सोलापूर शहरात पूर्वी ५० —६० लाकडांचे अड्डे होते. मागणीही तशी मोठया प्रमाणात असायची. मात्र, अलीकडे सर्वत्र स्वयंपाकघरात गॅसच्या शेगडीनं आपलं बस्तान मांडल्यामुळे दिवसेंदिवस हे अड्डे कमी होत चालले आहेत. लाकडांचा वापर केवळ स्मशानभूमीत दहन करण्यासाठी आणि काही प्रमाणात आजही समारंभाच्या होळीनिमित्त घरासमोर गोक्यांची निमित्ताने स्वयंपाकासाठी होत आहे. आता जे अड्डे आहेत ती संख्या येत्या १० वर्षांत आणखी कमी होऊन ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात प्रमाण कमी झाले आहे. शहराच्या हदवाढ भागात अजूनही काही ठिकाणी जल्लोषात सार्वजनिक स्वरूपात होळी पेटवून पारंपरिक उत्सव साजरा करून जल्लोष केला जातो. मात्र, हे प्रमाण गेल्या पंचवीस वर्षांच्या तुलनेत घटले आहे.
होळी साजरी करण्यासाठी नगानुसार गोवर्यांची विक्री करण्यात आली. यात अनेकांनी १५ ते २० रुपयास पाच नग गोवर्या दारावर विक्रीसाठी आलेल्या ‘विक्रेत्यांकडून खरेदी केल्या.
ग्रामीण भागात आजही सार्वजनिक होळी साजरी होण्याचे प्रमाण आहे. मात्र शहरी भागात बोटावर मोजण्याएवढ्या होळ्या पेटतात. आता पारंपरिक उत्सव म्हणून घरोघरी पाच गोवऱ्या आणून ती पेटवली जाते. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काटक्या, कागदांचा कचरा पेटवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.