मोहोळ : रात्रीच्या वेळी हॉटेल बंद करून घरी जात असताना हॉटेल शिवराजच्या मालकास डोळ््यात चटणी टाकून मारहाण करीत ३९ हजार रुपये लुटल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल शिवराजचे मालक विश्वराज विकास भोसले (रा. यमाई नगर, मोहोळ) हे ग्राहक संपल्यानंतर हॉटेल बंद करून शनिवारी मध्यरात्री १२.३0 च्या सुमारास घरी निघाले होते. त्यांच्यासमवेत दिवसभरात व्यवसाय झालेली ३९ हजार रूपयांची रक्कम होती. नरखेड रोड येथील पुलाखालून बायपास रोडने ते येत असताना समोरून तोंडाला रुमाल बांधलेले तिघेजण मोटारसायकल वरून वेगाने आले. त्या तिघांनी भोसले यांच्या मोटरसायकलला धडक दिली.
भोसले खाली पडताच त्यातील एकाने त्यांच्या डोळ््यात चटणी टाकली. तसेच भोसले यांना मारहाण केली. यानंतर गाडीच्या हँडलला अडकविलेल्या बॅगमधील ३९ हजार रुपये घेवून ते तिघे पळून गेले. मोहोळमधील काही लोक त्यानंतर तेथून जात असताना त्यांनी भोसले यांना मोहोळमध्ये पोलिस ठाण्यात आणले. यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.