27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूरमालट्रक व कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

मालट्रक व कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी : दगड अकोले पाटीजवळ झालेल्या मालट्रक व कारच्या धडकेत टेंभुर्णी येथील पती-पत्नी जागीच ठार झाले तर त्यांचा नातू जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. गोरख मारुती माने(५५) व ताई गोरख माने(४६) अशी अपघातात मरण पावलेल्या पती-पत्नी आहेत. तर नातू अनमोल शांतीलाल माने(२) हा बचावला आहे. गोरख माने व त्यांची पत्नी ताई माने हे दोघे आपल्या कार (एम एच ०९. ए. बी ७२५४)ने त्यांचा पंढरपूरमध्ये असलेला नातू अनमोल याला टेंभुर्णीकडे घेऊन निघाले होते. दगडअकोले बसथांब्याजवळ आले असताना टेंभुर्णीहून पंढरपूरकडे टेंभुर्णीतील खासगी हॉस्पिटलमध्ये येणा-या मालट्रकने कारला जोरात धडक दिली.

या अपघातात गोरख माने व ताई माने हे दोघे पतीपत्नी जागीच ठार झाले. त्यांचा नातू अनमोल माने बचावला त्याच्या पायाला जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्वत: धाव घेऊन पोलिस कर्मचा-यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. अनमोलचा गुरुवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी गोरख माने व ताई माने या पंढरपूर येथे नातवाला आणण्यासाठी गेले होते. अनमोलला पंढरपूरहून घेऊन टेंभुर्णीकडे येत असताना वाटेतच दगडअकोले या ठिकाणी माने पती-पत्नीवर काळाने घाला घातला. यात दोघांचा जीव गेला व नातू अनमोलचा वाढदिवस साजरा करण्याची माने पती-पत्नीची इच्छा अपुरी राहिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या