30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home सोलापूर मी अजून ही बारामतीचा नाद सोडलेला नाही

मी अजून ही बारामतीचा नाद सोडलेला नाही

एकमत ऑनलाईन

पोथरे : मी रासप पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने व खा.शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने अनेक वेळा कार्यक्रमात आम्हीं एकत्र येतो. याचा अर्थ मी माझ्या पक्षापासून व विचारापासून दुर गेलेलो नाही. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी आपण पवारांशी जवळीक साधत आहोत असा अर्थ काढू नये आजही आपण बारामतीचा नाद सोडलेला नसून 2024 ला आपला पक्ष बारामती मतदार संघासह राज्यातील 5 लोकसभा मतदार संघातून पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासूनच मोर्चा बांधणी करत आहोत असे स्पष्ट मत रासप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेवराव जानकर यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका पत्रकार संघाच्या पत्रकार कट्टयावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार महादेव जानकर बोलत होते.

यावेळी म.फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद ंिझजाडे, यशकल्याणीचे गणेश करे-पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, प्रा.वैभव फटांगरे, किरण गोफणे पुणे प्रभारी, रासप तालुका अध्यक्ष अंगद देवकते ,सतीश सिंगाडे,रासप ता.अध्यक्ष इंदापूर, चंद्रशेखर पाटील, ता.उपाध्यक्ष जोतिराम श्रीराम, नितीन पारेकर, दशरथ मारकड, जगन्नाथ सलगर, शहराध्यक्ष विलास घोणे, आश्पाक शेख, प्रकाश मामा कोळेकर, पोथरे ग्रामपंचायत उपसरपंच अंकुश शिंदे, संदिप मारकड, भाग्यवंत बंडगर इत्यादी उपस्थितीत होते.

यावेळी पुढे बोलताना आ.जानकर म्हणाले की, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी खरा विरोध काँग्रेस, भाजपा, असून या दोन पक्षाचा असून त्यांच्या मुळेच अद्यापपर्यंत जातीनिहाय जनगणना झालेली नाही. ही जनगणना होण्यासाठी आपल्या पक्षाचे 25 खासदार संसदेमध्ये निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न् करत आहोत. पक्षाचे 25 खासदार निवडून आल्याशिवाय केंद्रातील सरकार जातीनिहाय जनगणना करणार नाही असे स्पष्ट करुन आ.जानकर म्हणाले की, राज्यात भाजपा-सेना पक्षाचे सरकार असताना सर्व पक्षाच्या व घटक पक्षाच्या नेते मंडळींना विश्वासात घेवून आम्हीं मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले.
ते आरक्षण टिकण्यासाठी योग्य ते नियोजन करुन कोर्टामध्ये वकींलाची फौज उभा करुन मागासवर्गीय आयोग नेमून योग्य प्रकारे हे आरक्षण लागू गेले.

मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सध्याच्या तीन पक्षाच्या पायावर चालणा-या सरकारने हे आरक्षण टिकविण्यासाठी विशेष असा प्रयत्न् केला नाही. त्यामुळे आज सर्वोच्च् न्यायालयामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. माझे स्पष्ट मत आहे की, मराठा समाजातील उपेक्षित वर्गाला या आरक्षणचा लाभ झाला पाहिजे. त्याच बरोबर धनगर आरक्षणाचा जो विषय आहे हा केंद्र सरकारच्या अधिकारात येत असून हे आरक्षण मिळविण्यासाठी आपला पक्ष कटिबध्द आहे. येत्या काळात माझा पक्ष बारामतीसह माढा, परभणी, जालना, ंिहगोली या पाच मतदारसंघात लोकसभा सर्व ताकदीनिशी लढणार आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी सांगितले.

माझा राष्ट्रीय समाज पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, ंिहगोली, जालना, परभणी या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दाखवून देणार आहे. यावेळी त्यांनी मराठा धनगर आरक्षण तसेच सध्या दिल्ली येथे चाललेल्या शेतकरी आंदोलनावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या