सोलापूर : तुम्हाला राजकारण करायचे असेल तर स्पष्टपणे करा. समाज आणि भावनेचा आधार घेऊन करू नका. मी नको असेल तर लोकांमध्ये या. तुमची विश्वासार्हता किती आहे हे कळेल, असे आव्हान भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांना दिले.
चिमणी बचावसाठी काडादींनी १५ दिवसांपूर्वी महामोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या जाहीर सभेत काडादीनी आमदार देशमुख यांच्यावर टीका केली होती, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नेतृत्व बदलाची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. काडादींना प्रत्युत्तर देईन असे आमदार देशमुख म्हणाले होते. देशमुखांनी यावर सविस्तर भाष्य केले.
देशमुख म्हणाले, मुळात चिमणीचे बांधकाम बेकायदेशीर आहे. या बांधकामाची कागदपत्रे सर्वांनी काढून बघावीत. या बांधकामाला महापालिका . पर्यावरण खाते. एअरपोर्ट ऑथॉरिटीची परवानगी नाही.इतर अनेक परवाने नाहीत.आपण साधे घर बांधकाम करायचे तर महापालीकेचे सर्व परवाने घेतो.
चिमणीच्या पाडकामाचे आदेश न्यायालयाने दिले.महापालिकेने कारवाई सूरू केल्यानंतर कारखान्याचे काही संचालकांनी आमची भेट घेऊन काही दिवस मुदत द्या अशी मागणी केली.त्यावेळी मी दिलीप सोपल व कारखान्याचे संचालक फडणवीस यांना भेटलो. फडणवीस यांनी स्थगिती मिळवन दिली. स्थगिती मिळाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांच्या आत परवान्या आवश्यक होते. काडादीनी कोणत्याही प्रकारच्या परवाना घेतला नाही.पुन्हा विषय कोर्टात गेला.सिध्देश्वर देवस्थानच्या कामातही त्रास दिल्याची टीका काडादीनी केली होती. यावर देशमुख
म्हणाले देवस्थान कमिटीमध्ये मी पंच नाही किंवा सदस्य नाही, काडादी नेहमी भावनिक विषय करून आपण केलेल्या चुका दुसर्याच्या अंगावर घालतात, तुम्ही केलेल्या चुका कबूल करा. दुसर्याच्यय अंगावर कशाला घालता ज्या चुका तुम्ही केल्या त्या कायद्यानुसार निस्तारून घ्या. गेली अडीच वर्षे आमची सत्ता नव्हती. या काळात चिमणीच्या बांधकामाला परवानगी मिळाली का? आज तुम्ही आमचे विरोधक असलेल्या मोठ-मोठया लोकांची नावे घेता. तुमच्या बेकायदेशीर कामांना कोणते आमदार, खासदार मदत करणार आहेत? रोहित पवार, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांनी चिमणीला परवानगी मिळवून द्यायला हवी होती. दिली का?, असा सवालही देशमुखांनी केला.देशमुखांना मंत्री करण्यासाठी कर्नाटकातील
नातेवाईकाकडे शिफारस केली होती. असे धर्मराज काडादी म्हणाले होते. यावर भाष्य करताना देशमुख हसू लागले. मी लिंगायत समाजाचा आहे. काडादी आमच्या समाजाचे नेते असल्यामुळे बोलले असतील पण भारतीय जनता पक्ष दुसया पक्षातील माणसाचे ऐकून मला मंत्री करेल असे वाटत नाहीत. मंत्री झाल्यानंतर एक शब्द तुमच्या विरुद्ध उच्चारला नाही, असे देशमुख महणाले. तुमच्या विरोधात सहा माजी आमदार बोलले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार, खासदार बदला अशी भूमिका मांडली. त्यावर देशमुख म्हणाले तर उत्तरचे नेतृत्व बदला म्हणणाऱ्या माजी आमदारांना त्यांच्या मतदारांनी दुसयांदा आमदार केले नाही. मी चारवेळा निवडून आलो आहे.
माझ्यावर माझ्या मतदारांचा विश्वास आहे. मी बेकायदेशीर कामांना कधीच पाठिंबा दिलेला नाही. देशमुख म्हणाले, काडादींना यापूर्वी आम्ही मदत केली. आता मदत करायची म्हणजे बेकायदेशीर बांधकामांना मदत करायची कार न्यायालयाने तुमच्या विरोधात आदेश दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात आम्ही तुम्हाला मदत करायची का? चिमणी प्रकरणात विनाकारण भाजपच्या आमदार खासदारांना टार्गेट केले जात आहे.चिमणीच्या विरोधात एकाही भाजप लोकप्रतिनिधीने पत्र दीलेले नाही.उगाच आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे असे आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले.