26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeसोलापूरटेंभुर्णी परिसरात अवैध व्यावसाय जोमात, पोलीस प्रशासन कोमात

टेंभुर्णी परिसरात अवैध व्यावसाय जोमात, पोलीस प्रशासन कोमात

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी (गणेश चौगुले) :- सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील एक वजनदार असलेल्या टेंभूर्णी पोलीस ठाण्यात कार्यक्षेत्रात जीवघेणा गुटखा व आयुष्यच उध्वस्त करणारा मटका यासह जुगार, अवैध दारूविक्री, गांजा,वाळू,मुरुम, गोमांस वहातूक यासह अनेक बेकायदा धंद्ये पोलीस प्रशासनाचे अर्थपुर्ण हितसंबंध व राजकीय पाठबळमुळे दिवसाढवळया जोमात सुरु आहेत.

टेंभुर्णी परिसरात अवैध व्यवसायाने धुमाकुळ घतला आहे. ठिकठिकाणी मटक्याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकींसाठी जाळे पसरले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मटका घेतला जात आहे. दुष्काळी स्थिती व बेरोजगारी यामुळे टेंभुर्णी , मोडनिंब, बेंबळे, भिमानगर, रुई म्हसोबा, कन्हेरगांव, दहिवली, साखर कारखाना परिसर आदी मोठ्या गावांतील तरुण मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळत आहेत. कमीत कमी भांडवलात अल्पावधीत अधिकाधिक पैसे मिळविण्याकडे त्यांचा ओढा वाढत आहे. परिणामी गुटखा विक्री, मटका, जुगार,गांजा, मुरुम, बेकायदा दारुविक्री, वाळू तस्करी, अशा अनेक काळ्या धंद्यात तरुण गुरफटले आहेत. दररोज हजारों रुपयांचा मटका खेळुन काहींजण आयुष्यातुन उठले आहेत. तर काहीजण कर्ज काढुन मटका खेळत आहेत.

काहींनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. टेंभुर्णी मध्ये १७ ते १८ मटका बुकी चालत आहेत आणि तेही ऑनलाइन मोबाईल वरती मटका अंक घेत आहेत मटका बुकी चालकाकडून तसेच गुटका विक्रेते पोलीस प्रशासनासोबत मोठ्या प्रमाणात अथपुर्ण संबंध ठेऊन राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरत असल्याने अशा अवैध धंदे करणाऱ्या कडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याने त्यांच्या विरोधात कोणी धाडस करुन ताक्रारही करु शकत नाही.

पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अवैद्य धंदे खुलेआम चालू करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. खेड्यापाड्यातुन अनेकजण कामाला जातो म्हणुन सांगुन येथे दिवसभर मटका जुगार खेळत असतात. त्यांचे संसार उध्वस्त होऊ लागलेत. परिणामी त्रस्त कुटुंबिय व संतप्त नागरीक पोलिसांवर तोंडसुख घेत आहेत. अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती असताना अर्थपुर्ण संबंधामुळे व राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास ते धजावत नसल्याचे चित्र आहे. अवैध व्यावसायांना जास्त विरोध झाल्यास मोठ्या माशांना वाचवण्यासाठी मग किरकोळ व लहान माशांवर कार्यवाहीचा फार्स करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम पोलिस करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस काळ्या धंद्यात वाढच होत आहे.

दरम्यान, आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर तर शासनाने बंदी घातली असतानाही पोलीसांच्या आशिर्वादाने खुलेआम गुटखा विकला जात आहे. मटका व गुटखा विक्रेते, एजंटना राजाश्रय असल्याने बिनदिक्कत कोणालाही न जुमानता ते धंदा करीत आहेत. मटका व गुटख्याचा धंदा येथे जोमात सुरू असुन बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे. परिसरातील गावोगावचे लोक येथील विविध हॉटेल, ढाब्यांवर मद्यपानासाठी येत आहेत. परिणामी काळ्या धंद्यात दररोज लाखोंची कमाई होत आहे. त्या पैशांचा गैरवापर होऊन सामाजिक सलोख बिघडत आहे.

वरिष्ठ पोलीसांनी टेंभुर्णी परिसरातील अशा सर्वच बेकायदा व्यवसाय, काळ्या धंद्यांची पाळेमुळे खणुन काढावीत. करडी नजर ठेवुन कायद्याचा धाक निर्माण करावा. लोकांचे उध्वस्त होणार संसार वाचवावेत अशी आर्त मागणी टेंभुर्णी व परिसरातील नागरिक करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील या गोष्टीकडे लक्ष देतील काय असा सवाल सामान्य जनतेतून विचारला जात आहे.

कोणता पोलीस अधिकारी व कर्मचारी रेर्कार्डवर असलेल्या कोणत्या अवैध व्यावसायीकांबरोबर अर्थपुर्ण हितसंबंध जोपसत आहे, तसेच पोलीस ठाण्यात व बाहेर भरचौकात खांद्यावर हात ठेवून कोणता पोलीस कर्मचारी पाहूणचार करत आहेत हे जगजाहीर असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे कोणीही धाडस करत नाही. टेंभूर्णी पोलीसांचे अवैध व्यावसायीकांबरोबर असलेले अर्थपुर्ण हीतसंबंध शोधण्यासठी सोलापूचे पोलीस आधिक्षक मनोज पटील यांनी सायबर वरुन त्यांचे गेल्या सहा महिन्याचे मोबाईल कॉल डिटेल व पोलीस ठाण्यातचे सिसिटीव्ही फुटेज तपासावेत अशी मागणी जनतेतुन केली जात आहे.

उस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या