21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeसोलापूरअजनाळे गावात बेकायदेशीर दारूविक्री,जुगार,मटका जोमात सुरू; पोलीस प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष

अजनाळे गावात बेकायदेशीर दारूविक्री,जुगार,मटका जोमात सुरू; पोलीस प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

महुद : दारूसारख्या महाभयानक व्यसनाच्या आहारी जाऊन अजनाळे गावातील शकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत ही बाब लक्षात घेऊन अजनाळे ग्रामपंचायतीने अनेक वेळा गावात बेकायदेशीर दारू विक्रीला विरोध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. लॉक डाऊन च्या काळात अजनाळे गावात बेकायदेशीर खुलेआम दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अजनाळे गावातील बेकायदेशीर दारू विक्री, जुगार ,मटका बंद करावी अशी मागणी पत्रकार सचिन धांडोरे यांनी केली आहे.

डाळींबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेले गावात ५२७८ लोकसंख्येच्या गावातील शेकडो युवक, महिला गाव दारूबंदीसाठी गेल्या अनेक वर्षापासून झगडत आहेत गावामध्ये १२५० कुटुंब संख्या असलेले अजनाळे गाव शेती व्यवसाय अग्रेसर आहे या गावातील प्रत्येक कुटुंबातील बाहद्दर शेतकऱ्यांनी उजाड माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलवून आपले जीवनमान उंचावले आहे गावातील प्रत्येक कुटुंबाचे अर्थकारण मजबूत असल्याने गावातील आनेक संसार व्यसनाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त झाले आहेत एकीकडून पोलीस कारवाईचा फार्स करीत आहेत तर दुसरीकडे अवैद्य दारू विक्रेते पोलीस कारवाईला न जुमानता दारू विक्रीचा व्यवसाय जोमाने अजनाळे गावांमध्ये सुरू आहे.

दारूच्या व्यसनामुळे अनेक वेळा गावामध्ये भांडण-तंटे होत असल्याने वातावरण दूषित होत आहे. गावातील शेतकऱ्यांना डाळिंब हमखास येणाऱ्या पिकापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असल्याने हे गाव आर्थिक दृष्ट्या सदन मानले जाते सहाजिकच उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गावामध्ये व्यसनाधीनचे प्रमाण ही वाढू लागले आहे. बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना वेळेच आळा घालून गावातील संसार उघड्यावर येण्यापासून वाचवावेत अशी अपेक्षा गावातील सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महीलांनी दिला आहे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या